परभणी - जिल्हास्तरीय पहिले अक्षर साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन
साहित्य संमेलन यशस्वी करण्याचा सेलूकरांचा निर्धार परभणी, 1 नोव्हेंबर (हिं.स.)। सेलू येथील अक्षर प्रतिष्ठान आयोजित, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या अनुदानातून रविवार दि. १६ नोव्हेंबर
साहित्य संमेलन यशस्वी करण्याचा सेलूकरांचा निर्धार


साहित्य संमेलन यशस्वी करण्याचा सेलूकरांचा निर्धार

परभणी, 1 नोव्हेंबर (हिं.स.)।

सेलू येथील अक्षर प्रतिष्ठान आयोजित, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या अनुदानातून रविवार दि. १६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय पहिल्या अक्षर साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संयोजन समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर हे होते तर व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, जिल्हा परिषद परभणीचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र लहाने, माजी नगरसेवक मिलिंद सावंत, माजी नगरसेवक रहिम खान पठाण, उद्योजक महेशराव खारकर, महिला मंडळाच्या अध्यक्ष विजया कोठेकर, उद्योजक निलेश बिनायके, स्वागताध्यक्ष सर्जेराव लहाने यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह तयार केल्या बद्दल आहेर बोरगाव येथील नितीन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे कला शिक्षक संतोष ताल्डे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माजी नगरसेवक मिलिंद सावंत यांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या भावना मनोगतातून व्यक्त केल्या. सर्व मान्यवरांनी जिल्हास्तरीय पहिले अक्षर साहित्य संमेलनास सर्वतोपरी सहकार्य करून संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार केला गेला. यावेळी चंद्रशेखर मुळावेकर, देवगिरी बॅंकेचे शाखा व्यवस्थापक विश्वास देव, हरिकिशन शर्मा यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक संयोजन समितीचे सरचिटणीस प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांनी केले. सुत्रसंचलन अक्षर प्रतिष्ठान तथा संयोजन समिती सचिव डॉ. सुरेश हिवाळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन राम निकम यांनी केले. अक्षर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. शरद ठाकर, गणेश माळवे, शिवाजी शिंदे, करूणा बागले, डॉ. जयश्री सोन्नेकर, सुरेखा आगळे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande