ज्येष्ठ रंगकर्मी सुहास भोळे कोकणरत्न साहित्यिक पुरस्कार जाहीर
रत्नागिरी, 1 नोव्हेंबर, (हिं. स.) : रत्नागिरीत गेली पन्नास वर्षे रंगभूमीची अविरत सेवा करणारे रंगकर्मी कलाकार सुहास भोळे यांना स्वतंत्र कोकण राज्य अभियानातर्फे कोकणरत्न साहित्यिक पुरस्कार अध्यक्ष धनंजय कुसवेकर यांनी जाहीर केला आहे. स्वतंत्र कोकण रा
सुहास भोळे


रत्नागिरी, 1 नोव्हेंबर, (हिं. स.) : रत्नागिरीत गेली पन्नास वर्षे रंगभूमीची अविरत सेवा करणारे रंगकर्मी कलाकार सुहास भोळे यांना स्वतंत्र कोकण राज्य अभियानातर्फे कोकणरत्न साहित्यिक पुरस्कार अध्यक्ष धनंजय कुसवेकर यांनी जाहीर केला आहे.

स्वतंत्र कोकण राज्य अभियानातर्फे मुंबईपासून सिंधुदुर्गपर्यंत संपूर्ण कोकणातील सुमारे दीडशे निवडक व्यक्तींना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचा उल्लेख स्वतंत्र कोकणराज्य अभियानातर्फे कोकण रत्न पुरस्कार देण्यात आला असून त्याबाबतच्या निवडीचे पत्र पाठविण्यात आले आहे.

पुरस्कार प्रदान सोहळा १३ डिसेंबर रोजी संध्याकाळी ४ वाजता मुंबई मराठी पत्रकार भवन, आझाद मैदानाशेजारी, मुंबई येथे संस्थापक संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली होईल. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार, संपादक सचिन कळझुनकर उपस्थित राहणार आहेत.

सुहास भोळे यांना आतापर्यंत हबीब तन्वीर राष्ट्रीय पुरस्कार (२०१७), मधुकर तोरडमल चतुरस्र रंगकर्मी पुरस्कार (२०२२), भागोजीशेठ कीर काव्य पुरस्कार (२०२५), साहित्य कला साधना पुरस्कार (१९९४),

गुणवंत कामगार पुरस्कार (१९९२), दुसऱ्या कामगार साहित्य संमेलनात 'टकराव' ला नाट्यलेखन 'साहित्य पुरस्कार' (१९९१) तसेच कामगार कल्याण स्पर्धेत सलग ३ वर्षे 'सर्वोत्कृष्ट' नाट्यलेखन पुरस्कार (१९८५,८६,८७) मिळाला आहे. त्यांनी रंगभूमीवरील सर्वच क्षेत्रात घवघवीत यश संपादन केले असून लेखन, दिग्दर्शन, अभिनय, प्रकाश, नेपथ्य असे सर्वच नाट्यांगातील २६८ पुरस्कार लाभले आहेत. ते अध्यक्ष असलेल्या जिज्ञासा थिएटर्स या संस्थेला राज्यस्तरीय असंख्य पुरस्कार प्राप्त केले आहेत.

श्री. भोळे यांनी ३५ मराठी, हिंदी व इंग्रजी नाटकांचे लेखन केले असून ५० कलाकृतींची निर्मिती व दिग्दर्शन केले आहे. यासोबत त्यांनी तीन मराठी, दोन हिंदी व दोन इंग्रजी भाषेतील कादंबरी लेखन पूर्ण केले आहे. भोळे यांनी १९७८ साली नौदलाचे अखिल भारतीय समुद्री प्रशिक्षण पूर्ण केले असून त्यावेळी आय.एन्.एस्. त्राता, आय.एन्.एस्. कुठार, नौकावाहू आय्.एन्.एस्. विक्रांत या युद्धनौकांवर प्रत्येकी आठ दिवस तसेच आय्.एन्.एस्. खांदेरी या नौदलाच्या पाणबुडीत एक रात्र राहण्याचा अविस्मरणीय अनुभव घेतला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande