डोळ्यात पाणी, बांधावर पाणी… पावसाने बळीराजाचा संसार बुडवला
रायगड, 1 नोव्हेंबर (हिं.स.)। कोकणात पावसाने अक्षरशः थैमान घातले असून, मे ते ऑक्टोबर या कालावधीत पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नाही. या सततच्या अवकाळी पावसामुळे भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या मेहनतीचे पीक अक्षरशः पाण्यात गेले आहे. अ
कोकणात पावसाने अक्षरशः थैमान घातले असून, मे ते ऑक्टोबर या कालावधीत पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नाही. या सततच्या अवकाळी पावसामुळे भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या मेहनतीचे पीक अक्षरशः पाण्यात गेले आहे. अनेक ठिकाणी कापणीला आलेला तसेच कापलेला भात पावसात भिजून सडल्याने बळीराजा हतबल झाला आहे.  या गंभीर परिस्थितीत सत्ताधारी पक्ष व लोकप्रतिनिधी आपापल्या राजकीय कार्यक्रमांमध्ये, पक्षप्रवेश सोहळ्यांत व निवडणूक तयारीत व्यस्त असल्याचे दिसत आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही, अशी तीव्र टीका म्हसळा युवासेना तालुका अधिकारी कौस्तुभ करडे यांनी केली आहे.  “सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी पाहिले आहे का? नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसानभरपाई कधी मिळणार?” असा थेट सवाल करडे यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी पुढे सांगितले की, म्हसळा तालुक्यात शेतीचे प्रमाण घटत चालले असून, सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मनोबल खचले आहे.  शासनाने पंचनामे सुरू केले असले तरी केवळ घोषणा न करता ठोस आर्थिक मदत देणे अत्यावश्यक असल्याचे करडे यांनी सांगितले. “शेतकरी फक्त निवडणुकीपुरता आठवला जातो, परंतु प्रत्यक्ष अडचणीत त्याला वाऱ्यावर सोडले जाते. तरीही कोकणातील शेतकरी स्वाभिमानी व लढाऊ आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) युवासेना शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असेही करडे यांनी ठामपणे सांगितले आणि शासनाने तात्काळ मदतीची अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली.


रायगड, 1 नोव्हेंबर (हिं.स.)। कोकणात पावसाने अक्षरशः थैमान घातले असून, मे ते ऑक्टोबर या कालावधीत पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नाही. या सततच्या अवकाळी पावसामुळे भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या मेहनतीचे पीक अक्षरशः पाण्यात गेले आहे. अनेक ठिकाणी कापणीला आलेला तसेच कापलेला भात पावसात भिजून सडल्याने बळीराजा हतबल झाला आहे.

या गंभीर परिस्थितीत सत्ताधारी पक्ष व लोकप्रतिनिधी आपापल्या राजकीय कार्यक्रमांमध्ये, पक्षप्रवेश सोहळ्यांत व निवडणूक तयारीत व्यस्त असल्याचे दिसत आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही, अशी तीव्र टीका म्हसळा युवासेना तालुका अधिकारी कौस्तुभ करडे यांनी केली आहे.

“सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी पाहिले आहे का? नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसानभरपाई कधी मिळणार?” असा थेट सवाल करडे यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी पुढे सांगितले की, म्हसळा तालुक्यात शेतीचे प्रमाण घटत चालले असून, सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मनोबल खचले आहे.

शासनाने पंचनामे सुरू केले असले तरी केवळ घोषणा न करता ठोस आर्थिक मदत देणे अत्यावश्यक असल्याचे करडे यांनी सांगितले. “शेतकरी फक्त निवडणुकीपुरता आठवला जातो, परंतु प्रत्यक्ष अडचणीत त्याला वाऱ्यावर सोडले जाते. तरीही कोकणातील शेतकरी स्वाभिमानी व लढाऊ आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) युवासेना शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असेही करडे यांनी ठामपणे सांगितले आणि शासनाने तात्काळ मदतीची अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande