
रत्नागिरी, 1 नोव्हेंबर, (हिं. स.) : भारतीय डाक विभागामार्फत राजापूर तालुक्यातील रायपाटण ग्रामपंचायत कार्यालयात येत्या ७ नोव्हेंबर रोजी वित्तीय समायोजन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होणाऱ्या या मेळाव्यामध्ये पोस्ट ऑफिसमधील अनेक योजनांचा लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी घेता येणार आहे. मेळाव्यात लहान मुलांचे आधार कार्ड काढणे, अपडेट करणे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या सर्व सुविधा, ग्रामीण डाक विमा, डाक विमा, प्रधानमंत्री किसान योजना खाती, माझी लाडकी बहिण योजना खाती, जनसुरक्षा योजना, पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांची खाती, आधारवरील नाव बदलणे, पत्ता बदलणे, फोटो बदलणे, मोबाइल नंबर लिंक करणे अशा आधारसंबंधित सर्व प्रकारची सुविधा मिळणार आहे. रायपाटण येथे आयोजित वित्तीय समायोजन मेळाव्याचा ग्रामस्थांनी जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन रायपाटणचे सरपंच नीलेश चांदे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी