
नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर (हिं.स.)। प्रतिबंधात्मक आणि महिला-केंद्रित आरोग्यसुविधांप्रती भारताची अतुलनीय बांधिलकी दर्शवत देशव्यापी “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” अभियानांतर्गत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तीन गिनीज जागतिक विक्रम नोंदवले आहेत.
नोंदवलेले विक्रम
एका महिन्यात एखाद्या आरोग्य सुविधा मंचावर सर्वाधिक लोकांनी केलेली नोंदणी - 3,21,49,711 (3.21 कोटींपेक्षा अधिक)-
एका आठवड्यात स्तनाच्या कर्करोगाच्या चाचणीसाठी ऑनलाईन पद्धतीने सर्वाधिक लोकांचा सहभाग - 9,94,349 (9.94 लाखांहून अधिक) - राज्य पातळीवर एका आठवड्यात जीवनावश्यक मोजमापांच्या चाचणीसाठी सर्वाधिक लोकांचा ऑनलाईन सहभाग - 1,25,406 (1.25 लाखांहून अधिक) - देशातील प्रत्येक जिल्ह्यात पोहोचून या मोहिमेने अभूतपूर्व अशा 19.7 लाख आरोग्य शिबिरांच्या आयोजनासह सर्व आरोग्यसुविधा मंचांवर 11 कोटी लोकांच्या भेटीचा टप्पा गाठला.
“गिनीज जागतिक विक्रम” मंचाकडून मिळालेली ही मान्यता म्हणजे “निरोगी महिला, सक्षम कुटुंब आणि विकसित भारत” यांच्या उभारणीसाठी सरकारी यंत्रणा, डिजिटल आरोग्य नवोन्मेष आणि सामाजिक सहभाग यांचा संयोग साधणाऱ्या भारताच्या सामूहिक प्रयत्नांचा पुरावाच आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule