दर्यापूर नगराध्यक्षपदासाठी ‘घराण्यातील’ सामना!
भाजपकडून नलिनी भारसाकळे, तर काँग्रेसकडून मंदाकिनी भारसाकळे रिंगणात अमरावती, 12 नोव्हेंबर (हिं.स.)। राज्यातील नगरपरिषद निवडणुकांच्या रणसंग्रामाला आता जोर चढू लागला असून दर्यापूर नगरपरिषदेत यंदा सर्वाधिक चर्चेत असलेली लढत एकाच कुटुंबातील दोन सुनांम
राज्यातील नगरपरिषद निवडणुकांच्या रणसंग्रामाला आता जोर चढू लागला असून दर्यापूर नगरपरिषदेत यंदा सर्वाधिक चर्चेत असलेली लढत एकाच कुटुंबातील दोन सुनांमध्ये रंगणार आहे. भाजपकडून आमदार प्रकाश पाटील भारसाकळे यांच्या पत्नी नलिनी प्रकाशराव भारसाकळे यांची नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असताना, काँग्रेसने सहकार नेते सुधाकर पाटील भारसाकळे यांच्या पत्नी मंदाकिनी सुधाकरराव भारसाकळे यांना उमेदवार म्हणून अधिकृतपणे जाहीर केले आहे.दर्यापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद यंदा सर्वसाधारण (महिला) प्रवर्गासाठी राखीव असल्याने दोन्ही घराण्यांतून महिला उमेदवारच रिंगणात उतरल्या आहेत. नलिनी भारसाकळे यांनी यापूर्वी पाच वर्ष नगराध्यक्ष म्हणून काम करताना शहरात विविध विकासकामे राबविल्याने त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. दुसरीकडे, सहकार क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तिमत्व असलेल्या सुधाकर भारसाकळे यांनी आपल्या पत्नीला उमेदवार करून काँग्रेसची बाजू अधिक बळकट केली आहे.राजकीयदृष्ट्या प्रभावशाली असलेल्या भारसाकळे घराण्यातील या ‘सुना विरुद्ध सुना’ लढतीकडे केवळ दर्यापूरच नव्हे तर संपूर्ण अमरावती जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. काँग्रेसचा उमेदवार निश्चित झाल्यानंतर इतर पक्षांकडून अजूनही युती आणि उमेदवारीची चाचपणी सुरू आहे.दर्यापूर नगरपरिषदेतील २५ नगरसेवक पदांसाठी अजून कोणत्याच पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. पक्षांतर्गत बंडाळी टाळण्यासाठी उमेदवार जाहीर करण्यात विलंब होत असल्याचे बोलले जात आहे. १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, येत्या आठवड्यात दर्यापूरचे संपूर्ण निवडणूक चित्र स्पष्ट होईल, अशी राजकीय वर्तुळातील चर्चा आहे.

भाजपकडून नलिनी भारसाकळे, तर काँग्रेसकडून मंदाकिनी भारसाकळे रिंगणात

अमरावती, 12 नोव्हेंबर (हिं.स.)।

राज्यातील नगरपरिषद निवडणुकांच्या रणसंग्रामाला आता जोर चढू लागला असून दर्यापूर नगरपरिषदेत यंदा सर्वाधिक चर्चेत असलेली लढत एकाच कुटुंबातील दोन सुनांमध्ये रंगणार आहे. भाजपकडून आमदार प्रकाश पाटील भारसाकळे यांच्या पत्नी नलिनी प्रकाशराव भारसाकळे यांची नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असताना, काँग्रेसने सहकार नेते सुधाकर पाटील भारसाकळे यांच्या पत्नी मंदाकिनी सुधाकरराव भारसाकळे यांना उमेदवार म्हणून अधिकृतपणे जाहीर केले आहे.

दर्यापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद यंदा सर्वसाधारण (महिला) प्रवर्गासाठी राखीव असल्याने दोन्ही घराण्यांतून महिला उमेदवारच रिंगणात उतरल्या आहेत. नलिनी भारसाकळे यांनी यापूर्वी पाच वर्ष नगराध्यक्ष म्हणून काम करताना शहरात विविध विकासकामे राबविल्याने त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. दुसरीकडे, सहकार क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तिमत्व असलेल्या सुधाकर भारसाकळे यांनी आपल्या पत्नीला उमेदवार करून काँग्रेसची बाजू अधिक बळकट केली आहे.राजकीयदृष्ट्या प्रभावशाली असलेल्या भारसाकळे घराण्यातील या ‘सुना विरुद्ध सुना’ लढतीकडे केवळ दर्यापूरच नव्हे तर संपूर्ण अमरावती जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. काँग्रेसचा उमेदवार निश्चित झाल्यानंतर इतर पक्षांकडून अजूनही युती आणि उमेदवारीची चाचपणी सुरू आहे.दर्यापूर नगरपरिषदेतील २५ नगरसेवक पदांसाठी अजून कोणत्याच पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. पक्षांतर्गत बंडाळी टाळण्यासाठी उमेदवार जाहीर करण्यात विलंब होत असल्याचे बोलले जात आहे. १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, येत्या आठवड्यात दर्यापूरचे संपूर्ण निवडणूक चित्र स्पष्ट होईल, अशी राजकीय वर्तुळातील चर्चा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी

 rajesh pande