बोगस डॉक्टरांवर पोलिसांच्या समन्वयाने कारवाई करावी - अमरावती जिल्हाधिकारी
अमरावती, 12 नोव्हेंबर (हिं.स.) बोगस डॉक्टरांच्या संदर्भात आलेल्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करावी. याबाबत सखोल तपासासाठी आरोग्य यंत्रणांकडे आलेल्या तक्रारी पोलिसांनाही देण्यात याव्यात. यामुळे भविष्यातही कारवाई करता येईल, असे जिल्हाधिकारी आशिष य
बोगस डॉक्टरांवर पोलिसांच्या समन्वयाने कारवाई करावी* -जिल्हाधिकारी आशिष येरेकर


अमरावती, 12 नोव्हेंबर (हिं.स.)

बोगस डॉक्टरांच्या संदर्भात आलेल्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करावी. याबाबत सखोल तपासासाठी आरोग्य यंत्रणांकडे आलेल्या तक्रारी पोलिसांनाही देण्यात याव्यात. यामुळे भविष्यातही कारवाई करता येईल, असे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज बोगस वैद्यकीय व्यावसायिकांवर आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याकरीता जिल्हास्तरीय समिततीची सभा पार पडली. यावेळी पोलिस उपअधिक्षक राजेश भुयार, पोलिस निरीक्षक सिमा दाताळकर, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, डॉ. विजय अजमिरे, पवन टेकाळे, डॉ. अनिल माणिकराव आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी येरेकर यांनी, नागरिकांच्या तक्रारीसोबतच प्रसारमाध्यमांमधील आलेल्या बातम्यांनुसार बोगस डॉक्टरांवर कारवाई करावी. ही कारवाई करताना पोलिस विभागाला याची माहिती देण्यात यावी. पोलिसांना माहिती दिल्यास नंतरच्या काळात इतरत्र व्यवसाय करीत असल्याची माहिती मिळण्यास मदत होईल. जिल्ह्यात प्रामुख्याने चांदूरबाजार परिसरात बोगस डॉक्टरांच्या तक्रारी अधिक प्रमाणात येत आहे. त्यामुळे या भागात लक्ष देण्यात यावे. पोलिस आणि आरोग्य विभागाकडे आलेल्या तक्रारीवर तातडीने कारवाई करावी. कारवाई करताना पोलिसांचे सहकार्य घ्यावे. जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचे प्रमाण कमी असले तरी आलेल्या तक्रारीवर कारवाई होणे आवश्यक आहे. यामुळे भविष्यात होणारा अपघात टाळल्या जाऊ शकेल. नागरिकांनीही परिसरात बोगस डॉक्टर व्यवसाय करीत असल्याचे आढळल्यास तातडीने पोलिस आणि आरोग्य विभागाकडे माहिती द्यावी, असे आवाहन येरेकर यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande