दिव्यांगांसाठी काम करणा-या संस्थांना नोंदणी अनिवार्य
अकोला, 12 नोव्हेंबर (हिं.स.)।दिव्यांगांसाठी काम करणा-या संस्थांना नोंदणी अनिवार्य असून, त्यांनी ती 30 नोव्हेंबरपूर्वी पूर्ण करून घेण्याचे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी डॉ. तुषार जाधव यांनी केले. दिव्यांग हक्क अधिनियम 2016 नुसार दिव्यांग
दिव्यांगांसाठी काम करणा-या संस्थांना नोंदणी अनिवार्य


अकोला, 12 नोव्हेंबर (हिं.स.)।दिव्यांगांसाठी काम करणा-या संस्थांना नोंदणी अनिवार्य असून, त्यांनी ती 30 नोव्हेंबरपूर्वी पूर्ण करून घेण्याचे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी डॉ. तुषार जाधव यांनी केले.

दिव्यांग हक्क अधिनियम 2016 नुसार दिव्यांग कल्याण क्षेत्रात काम करणा-या संस्थांना नोंदणी आवश्यक आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2000 नुसार दिव्यांग कल्याण आयुक्तांना सक्षम प्राधिकारी घोषित करण्यात आले असून, त्यांच्यामार्फत नोंदणी प्रमाणपत्र मिळते. इच्छूक संस्थांनी नोंदणी प्रस्ताव दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, अकोला यांच्याकडे दि. 30 नोव्हेंबरपूर्वी सादर करावा. विनानोंदणी संस्थांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

---------------

/ Manish Kulkarni


 rajesh pande