
अकोला, 12 नोव्हेंबर (हिं.स.) : अकोला पोलीस दलामार्फत जिल्ह्यातील अवैध गावठी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यां विरुद्ध 'ऑपरेशन प्रहार' अंतर्गत विशेष मोहीम राबविण्यात आली. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवस सकाळी १२ ते रात्री १२ वाजेपर्यंत ही मोहीम प्रभावीपणे पार पडली. या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतील पोलीस पथकांनी एकूण ७५ ठिकाणी कारवाई केली आहे. कारवाईदरम्यान सुमारे ७,३६,४२५/- रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला, तर अवैध धंद्यात सामील असलेल्यांवर आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. तसेच, स्थानिक गुन्हे शाखेने स्वतंत्रपणे ०१ ठिकाणी छापा टाकत अवैध दारू विक्री व निर्माण करणाऱ्या ठिकाणांवर धडक देवुन लिटर गावठी दारू ०५ लिटर व १०० लिटर सडवा मोहमाच एकुण किंमत १६०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, अशा प्रकारे अकोला जिल्हा पोलिसांनी एकूण ७,५४, २२५/- रुपयांच्या अवैध दारू साहित्यावर कारवाई केली आहे.
अवैध गावठी दारू उत्पादनामुळे जनतेच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होवुन व शांतता भंग होते. या पार्शवभूमीवर अकोला पोलिस दलाने अशा अवैध धंद्यावर कठोर कारवाई करताना जनतेचा विश्वास कायम ठेवला आहे. पुढील काळात अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी या पुढे सुध्दा नेहमी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाने कळविले आहे.अवैध दारू विरोधातील ही मोहीम सुरूच राहणार असून, नागरिकांनी अशा प्रकारच्या बेकायदेशीर अवैध दारू विक्री व निर्माण करणाऱ्या विषयी माहिती असल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात कळवावे, असे आवाहन अकोला पोलीस दलाकडून करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे