अकोला : शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग
अकोला, 12 नोव्हेंबर (हिं.स.)। अकोला जिल्ह्यातल्या पातूर तालुक्यातील नवेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकाने शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरोपी शिक्षक सुधाकर जानक
अकोला : शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग


अकोला, 12 नोव्हेंबर (हिं.स.)। अकोला जिल्ह्यातल्या पातूर तालुक्यातील नवेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकाने शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरोपी शिक्षक सुधाकर जानकीराम पांडे यास पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षकाने गेल्या सहा दिवसांपूर्वी शाळेतच अल्पवयीन मुलीसोबत अनुचित वर्तन केले. विद्यार्थिनीने घरी जाऊन आपल्यावर झालेल्या प्रकाराची माहिती कुटुंबीयांना दिली. संतप्त पालकांनी तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीस ताब्यात घेतले आहे.या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, शाळेत आणि परिसरात सुरक्षा उपाययोजनांची मागणी होत आहे. शैक्षणिक संस्थांतील अशा घटनांमुळे समाजमन संतप्त झाले असून, “शिक्षक ही विद्यार्थ्यांसाठी आदर्श असण्याची जागा आहे; अशा विकृत प्रवृत्तीला कठोर शिक्षा मिळालीच पाहिजे,” अशी प्रतिक्रिया पालक व नागरिकांनी दिली आहे.पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande