
बीड, 12 नोव्हेंबर (हिं.स.) बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई आणि परळी नगर परिषदेच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढण्याची शक्यता आहे अंबाजोगाई आणि परळी नगरपालिकेतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी घेतले आहेत तसेच संकेत जिल्हाप्रमुख यांनी दिली आहेत अंबाजोगाई आणि परळी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना स्वबळावर उतरेल असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे.
आगामी अंबाजोगाई आणि परळी नगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने उमेदवार निवडीची प्रक्रिया वेगात सुरू केली आहे. शिवसेने मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार, जिल्हा संपर्कप्रमुख जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. आगामी पालिका निवडणुकीत विकासाभिम उमेदवारांनाच शिवसेनेकडून संधी मिळणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील सर्वच नगर पालिकांवर भगवा फडकविण्यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी स्वतः इच्छुकांच्या घेतल्या.
-----------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis