संतोष देशमुख हत्या प्रकरण, पुढील सुनावणी २७ नोव्हेंबर रोजी
बीड, 12 नोव्हेंबर (हिं.स.)।बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी होती. मात्र आरोपी विष्णु चाटेच्या वकिलांनी वेळ वाढवून मागितल्याने ही सुनावणी आता २७नोव्हेंबर रोजी होणार आहे. वि
कोर्ट लोगो


बीड, 12 नोव्हेंबर (हिं.स.)।बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी होती. मात्र आरोपी विष्णु चाटेच्या वकिलांनी वेळ वाढवून मागितल्याने ही सुनावणी आता २७नोव्हेंबर रोजी होणार आहे. विष्णू चाटे याने केलेल्या जामीन अर्जावर सरकारी पक्षाकडून लेखी म्हणणे न्यायालयाकडे सादर करण्यात आले. मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. ८० दिवसांत एसआयटीने तपास करून दोषारोपपत्र सादर केले आहे. बीड येथील मकोका विशेष न्यायालयात न्या. व्यंकटेश पाटवदकर यांच्यासमोर प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. न्यायालयाने वाल्मीक कराडसह सुदर्शन घुले व विष्णू चाटे यांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला आहे. महेश केदार, जयराम चाटे, सुधीर सांगळे, प्रतीक घुले यांच्या अर्जावर निर्णय बाकी आहे. मकोका कायद्यानुसार मालमत्ता जप्ती करता येते. त्यानुसार वाल्मिक कराडच्या मालमत्ता जप्तीचा अर्ज एसआयटीने केलेला आहे. त्यावर युक्तीवाद पूर्ण झालेला आहे. त्यावर निर्णय बाकी आहे. अद्यापही झालेला नाही.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande