अमरावती : नवरदेवावर चाकू हल्ला 
अमरावती, 12 नोव्हेंबर (हिं.स.) बडनेरा येथे आयोजित नवविवाहितांच्या रिसेप्शन कार्यक्रमात नवरदेवावर दोन अज्ञात व्यक्तींनी चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली. हल्ल्यानंतर दोन्ही आरोपी स्टेजच्या मागील बाजूने पळून गेले असून, संपूर्
‘येणाऱ्या आयुष्याच्या सुरुवातीलाच रक्ताचे डाग!’  रिसेप्शनमध्ये नवरदेवावर चाकू हल्ला  अज्ञात हल्लेखोर पसार, साहिल लॉन मधील धक्कादायक प्रकार


अमरावती, 12 नोव्हेंबर (हिं.स.)

बडनेरा येथे आयोजित नवविवाहितांच्या रिसेप्शन कार्यक्रमात नवरदेवावर दोन अज्ञात व्यक्तींनी चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली. हल्ल्यानंतर दोन्ही आरोपी स्टेजच्या मागील बाजूने पळून गेले असून, संपूर्ण प्रकार रिसेप्शनमध्ये लावलेल्या ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाल्याचे समजते.माताफैल परिसरातील सुजलराम चरण समुद्रे याचा विवाह सोमवारी अचलपूर येथे पार पडला होता. त्यानंतर मंगळवारी रात्री बडनेरा रोडवरील साहिल लॉन येथे रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. रात्री सुमारे १०.३० वाजताच्या सुमारास जेवणाचा कार्यक्रम सुरू असतानाच दोन संशयित व्यक्ती स्टेजवर पोहोचले. एका काळ्या शर्टमध्ये तर दुसरा जर्किनमध्ये होता. त्यांनी अचानक नवरदेवावर चाकूने हल्ला केला.या घटनेनंतर पाहुण्यांमध्ये आरडाओरड सुरू झाली. नवरदेव जखमी अवस्थेत खाली कोसळला, तर नवरी घाबरून ओरडू लागली. काही पाहुण्यांनी आरोपींचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते अंधाराचा फायदा घेत पसार झाले. हल्ल्यानंतर काही क्षणांमध्ये लॉन परिसरात तोडफोड झाल्याचेही सांगितले जात आहे.

जखमी नवरदेव सुजल समुद्रे याला तत्काळ इर्विन रुग्णालयात नेण्यात आले, त्यानंतर पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच डीसीपी गणेश शिंदे, एसीपी कैलाश पुंडकर, ठाणेदार सुनिल चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसराची पाहणी करून ड्रोन फुटेज जप्त केले आहे.हल्ल्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. बडनेरा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande