सीसीआय कापूस खरेदी केंद्राचे उद्घाटन ८ हजार ६० रुपये हमीभाव खरेदी
जळगाव , 12 नोव्हेंबर (हिं.स.)कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा व सी. सी. आय. दिल्लीतर्फे पाचोरा येथील श्री गजानन जिनिंग आणि प्रेसिंग फॅक्टरी येथे हमीभाव कापूस खरेदी केंद्राचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा चे सभापती गणेश पाटील यांच्या हस्ते
सीसीआय कापूस खरेदी केंद्राचे उद्घाटन ८ हजार ६० रुपये हमीभाव खरेदी


जळगाव , 12 नोव्हेंबर (हिं.स.)कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा व सी. सी. आय. दिल्लीतर्फे पाचोरा येथील श्री गजानन जिनिंग आणि प्रेसिंग फॅक्टरी येथे हमीभाव कापूस खरेदी केंद्राचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा चे सभापती गणेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या निमित्ताने सभापती गणेश पाटील तसेच जिनिंगचे संचालक प्रमोद सोनार यांच्या हस्ते सर्वप्रथम काटा पूजन व वाहनाने कापूस आणणारे पहिले शेतकरी गोविंद वाणी व गायत्री वाणी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी हमीभाव ८ हजार ६० रुपये प्रमाणे कापसाला भाव देण्यात आला.

गिरड रोडवरील श्री गजानन जिनिंग आणि प्रेसिंग फॅक्टरी ची जुनी कालबाह्य यंत्रसामग्री बदलून नुकतेच अत्याधुनिक व स्वयंचलित जिनिंग आणि प्रेसिंग युनिट बसविण्यात आले आहे. श्री गजानन जीनिंग आणि प्रेसिंग फॅक्टरी येथील हमीभाव कापूस खरेदी केंद्राचे उद्घाटन प्रसंगी सभापती गणेश पाटील, सी. सी. आय. केंद्र अधिकारी अनंत पुंडकर, जिनिंगचे संचालक प्रमोद सोनार, गजानन उद्योग समूहाचे संचालक राजाराम सोनार, कृषी उत्पन्न बाजार समिती चे सचिव बी. बी. बोरुडे, संचालक सुनील पाटील, प्रकाश तांबे, राहुल पाटील, युसुफ पटेल, निखिल पवार, व्ही. सी. पाटील, आर. एच. देशमुख व गजानन जिनिंग आणि प्रेसिंग फॅक्टरी चे कर्मचारी कुंदन गायकवाड, रामदास घोडके, राजू बागवान पप्पू नावडे, शेषराज राठोड व मेघराज राठोड उपस्थित होते. यावेळी कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून सी. सी. आय. ची नवीन कापूस खरेदी प्रणाली समजून घेत होते तसेच या कापूस हंगामातील कापसाचे पेमेंट नवीन खरेदी प्रसंगी शेतकरी आधारकार्ड वर लिंक असलेल्या बँक खात्यावर तात्काळ पेमेंट होणार आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना बँक पासबुक ऐवजी फक्त आधार कार्ड वरच पेमेंट होऊन रक्कम मिळण्यास सोपे होणार आहे. तसेच यंदा मात्र प्रति एकरी ५ क्विंटल कापूस खाली केला जाईल. कापूस ८ ते १२ टक्के आद्रता असलेला व काडी कचरा व कवडी विरहीत कापूसच खरेदी केला जाईल. नाव नोदणी केलेल्या शेतकऱ्याची कागदपत्रे तपासून मंजूर (अप्रूव्ह) झालेल्या शेतकऱ्यानाच स्लॉट बुक करता येईल. मोबाइल ऑप वर स्लॉट बुक केल्यावरच कापूस खरेदी केंद्रावर आणता येणार आहे. मोबाइल ऑप नोदणी व स्लॉट बुकिंग या आधुनिक प्रणाली मुले शेतकरी बांधवाना मार्केट कमेटीत टोकन अथवा जिनिंग फॅक्टरीत रांगेत दोन दोन दिवस उभे राहण्याची वेळ आता येणार नाही. सी. सी. आय. कापूस खरेदी प्रसंगी मोठ्या प्रमाणात पंचक्रोशीतील शेतकरी कापूस आणण्याबाबत माहिती घेताना दिसत होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande