
चंद्रपूर, 12 नोव्हेंबर, (हिं.स.)। नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि. 12) बल्लारपूर नगर परिषद क्षेत्रातील मतदान केंद्र आणि स्ट्राँग रुमची पाहणी करून सूचना दिल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी अजय चरडे, तहसीलदार रेणूका कोकाटे, न.प. मुख्याधिकारी विशाल वाघ आदी उपस्थित होते.
नगर परिषद बल्लारपूर निवडणूक संबंधाने जिल्हाधिका-यांनी मतदान केंद्र क्रमांक 1 ते 5/5 ची पाहणी केली. पाहणी दरम्यान सर्व मतदान केंद्रावर लाईटची व्यवस्था करण्याच्या सुचना दिल्या. यावेळी त्यांनी स्ट्राँग रुम, मतमोजणी कक्ष तसेच बल्लारपूर तालुक्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक संबंधाने मतदान केंद्राचीचीसुध्दा पाहणी केली.
विसापूर येथील पीएचसीला भेट :- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी विसापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, तालुका वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते. स्मार्ट पीएचसी अंतर्गत हे काम त्वरीत पूर्ण करावे. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. कार्यकारी अभियंता, उपअभियंता आणि संबंधित कंत्राटदार यांची बैठक आयोजित करण्याच्या सुचना दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव