चंद्रपूर - अधिनियमातील कलम 26 मधील तरतुदीचे पालन न केल्यास दंड - भस्मे
चंद्रपूर, 12 नोव्हेंबर (हिं.स.)। केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयाने कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणी निवारण) अधिनियम, 2013 ची प्रभावी अंमलबजावणी करीता ‘शी बॉक्स पोर्टल’ तयार केले आहे. त्यात महिलांना ऑ
चंद्रपूर - अधिनियमातील कलम 26 मधील तरतुदीचे पालन न केल्यास दंड - भस्मे


चंद्रपूर, 12 नोव्हेंबर (हिं.स.)। केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयाने कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणी निवारण) अधिनियम, 2013 ची प्रभावी अंमलबजावणी करीता ‘शी बॉक्स पोर्टल’ तयार केले आहे. त्यात महिलांना ऑनलाईन तक्रार नोंदविण्याचे सुविधेसोबत शासकीय व खाजगी आस्थापनांना अधिनियमांतर्गत स्थापन समितीची व इतर माहिती अपलोड करण्याची सुविधा देखिल उपलब्ध करून दिली आहे.

खाजगी आस्थापना, कार्यालये, कंपनी, एम. आय.डी.सी, मॉल, शैक्षणिक संस्था दुकाने, बँक, शासकीय संस्था, ट्रस्ट, सोसायटी, उत्पादक, पुरवठा, वितरण व विक्री, करमणुक क्रीडा संकुले, प्रेक्षागृहे, आरोग्य सेवा देणारे इत्यादी मध्ये 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असल्यास अंतर्गत तक्रार समितीची स्थापना करून त्याप्रमाणे माहिती https://shebox.wcd.gov.in या वेबसाईटवरील होम स्क्रीनवर दाखविल्याप्रमाणे Private Head Office Registration मध्ये आवश्यक तपशील भरून नोंदणी करावी. याबाबत काही तांत्रिक अडचण असल्यास दूरध्वनी क्रमांक 011-23388074 यावर किंवा ई मेल- tech support-shebox@gov.in येथे संपर्क करावा.

अधिनियमातील कलम 26 मधील तरतुदीचे पालन न केल्यास मालकास 50 हजार रुपयांपर्यंत दंड होईल. तसेच हाच प्रकार पुन्हा घडल्यास आस्थापनेचा परवाना रद्द व दुप्पट दंड अशी तरतुद आहे, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande