
जालना, 12 नोव्हेंबर (हिं.स.)।
जालना जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद, नगर पंचायती तसेच जालना महानगरपालिका क्षेत्रात मालमत्ता कर व इतर स्थानिक करांचे उत्पन्न वाढविण्यासाठी ‘कर मुल्यांकन’ बाबत विशेष मोहीम राबविण्याबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात नगर प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त, सह आयुक्त व जिल्हातील सर्व नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या आढावा बैठकीत सदरील निर्देश देण्यात आले. या मोहिमेद्वारे जालना शहर महानगरपालिका क्षेत्रातील, तसेच जिल्हातील सर्व नगर परिषद व नगर पंचायत क्षेत्रातील प्रत्येक घर, व्यावसायिक आस्थापना मधील बांधकामांचे सर्वेक्षण करून करनिर्धारण अद्ययावत केले जाणार आहे. या उपक्रमाद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा उद्देश आहे.याद्वारे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी थकीत कर वसुली भरुन प्रशासनास सहकार्य करावे जेणेकरून आपणास महानगरपालिका, नगर परिषद व नगर पंचायत कडून अधिकाधिक उत्तमरित्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास मदत होईल. या बैठकीत घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, प्रधानमंत्री आवास योजना शहरी, पी. एम. विश्वकर्मा,पी.एम.स्व निधी, दिन दयाळ अंत्योदय योजना, उप जिविका अभियानाविषयी आढावा घेण्यात आला. प्रत्येक नगर परिषद कार्यक्षेत्रात प्लास्टिक प्रोसेसिंग सेंटर उभारण्याचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी निर्देश दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis