दिल्लीतील स्फोटानंतर विठ्ठल मंदिराची सुरक्षा व्यवस्था हाय अलर्टवर'
सोलापूर, 12 नोव्हेंबर (हिं.स.)। दिल्लीतील स्फोटानंतर पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. मंदिराचे व्हीआयपी गेट, पश्चिमद्वार, संत नामदेव पायरी येथे चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवाय दर्शनासाठी येणाऱ्
दिल्लीतील स्फोटानंतर विठ्ठल मंदिराची सुरक्षा व्यवस्था हाय अलर्टवर'


सोलापूर, 12 नोव्हेंबर (हिं.स.)। दिल्लीतील स्फोटानंतर पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. मंदिराचे व्हीआयपी गेट, पश्चिमद्वार, संत नामदेव पायरी येथे चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवाय दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाची तपासणी करूनच मंदिरात सोडले जात आहे. दरम्यान, आज बॉम्बशोध पथकाने श्वानाच्या मदतीने मंदिर व परिसराची तपासणी केली.दिल्लीत बॉम्बस्फोट झाला. या घटनेचे सर्वत्र पडसाद उमटले आहेत. त्यानंतर पोलिसांनी महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी हाय अलर्ट दिला आहे. पंढरपूर हे राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. येथे श्री विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनासाठी हजारो भाविक येतात. येथील भाविकांची सुरक्षा महत्त्वाची आहे.त्या दृष्टीने जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी मंदिरातील सुरक्षेचा आढावा घेऊन पोलिसांना सूचना दिल्या. दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाची व सोबत असलेल्या सामानाची स्कॅनिंग मशीनद्वारे तपासणी केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande