
पुणे, 12 नोव्हेंबर (हिं.स.)।
राजधानी दिल्लीमध्ये दोन बॉम्बस्फोट झाले. यामध्ये 9 लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे 24 जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींवर रुग्णलयात उपचार सुरु आहेत. दिल्लीत झालेल्या या स्फोटानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. मुंबईत देखील सूरक्षा यंत्रणेत वाढ करण्यात आली. यानंतर नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील स्फोटानंतर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच या परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनाची पाहणी देखील सुरू आहे.पोलिसांची सुरक्षा देखील वाढवण्यात आली. प्रमुख स्थानकांवर रेल्वे सुरक्षा दल (RPF), सरकारी रेल्वे पोलिस (GRP) आणि श्वान पथके तैनात करण्यात आली आहेत. कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, तर प्रवाशांची तपासणी आणि गस्त देखील वाढविण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु