
जालना, 12 नोव्हेंबर (हिं.स.)।
घनसावंगी येथून जालनाकडे येत असताना गाडे सावरगाव जवळ उप प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन चिंतल यांना रस्त्यावर इलेक्ट्रिक पोल धोकादायक स्थितीत रस्त्यावर आडवा झालेला दिसून आला. या रस्त्यावरून प्रामुख्याने दुचाकी वाहनांची वाहतूक होत असते. एखादा दुचाकीस्वार अथवा वाहनधारकाचा पोलला धडकून अपघात घडू नये म्हणून जालनाचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन चिंतल आणि वाहनचालक संतोष थोरात यांनी स्वतः स्थानिकांची मदत घेऊन तो पोल उचलून सुरक्षितपणे उचलून बाजूला केला. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी वाहतुकीच्या रस्त्यावर लोखंडी पोल अथवा फलक वाहतुकीस अडथळा किंवा धोका निर्माण करु शकतील, अशा स्थितीत दिसून आल्यास तात्काळ उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, पोलीस किंवा सार्वजनिक बांधकाम विभागास त्वरित संपर्क साधून कळवावे. प्रशासनाची मदत घेऊन किंवा स्थानिकांची मदत घेऊन ते तात्काळ रस्त्यावरून बाजूला करून घ्यावे आणि अपघात टाळण्यास मदत करावी. अशा कृतीने आपण अपघात टाळू शकतो आणि कोणाचा जीव वाचू शकतो.असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन कृष्णा चिंतल यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis