लातूरचे माजी महापौर सुरेश पवार यांचा शिवसेनेत प्रवेश!
लातूर, 12 नोव्हेंबर (हिं.स.)। लातूर माजी महापौर सुरेश पवार यांनी मुंबईत शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. सुरेश पवार यांचा हा प्रवेश केवळ त्यांच्या वैयक्तिक राजकीय प्रवासातीलच नव्हे, तर लातूर जिल्ह्याच्या र
लातूर जिल्ह्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारा


लातूर, 12 नोव्हेंबर (हिं.स.)।

लातूर माजी महापौर सुरेश पवार यांनी मुंबईत शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. सुरेश पवार यांचा हा प्रवेश केवळ त्यांच्या वैयक्तिक राजकीय प्रवासातीलच नव्हे, तर लातूर जिल्ह्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारा मानला जात आहे.

लातूरमध्ये एक सक्षम आणि प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे सुरेश पवार यांनी आपल्या अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांसह 'वर्षा' गाठले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात उत्स्फूर्त स्वागत केले आणि त्यांना भगवा शेला घातला.

शिंदे यांनी यावेळी बोलताना, सुरेश पवार यांच्यासारख्या अनुभवी आणि जनमानसात मिसळलेल्या नेत्याच्या प्रवेशामुळे लातूरमध्ये शिवसेनेची ताकद निश्चितपणे वाढेल. त्यांच्या अनुभवाचा उपयोग पक्ष वाढीसाठी होईल, असा विश्वास व्यक्त केला.

सुरेश पवार यांच्या शिवसेना प्रवेशामुळे आता लातूर महानगरपालिका आणि जिल्ह्यातील आगामी निवडणुकांचे चित्र बदलण्याची शक्यता आहे. भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला हा एक मोठा धक्का मानला जात आहे,

आता लातूरमध्ये राजकीय समीकरणे कशी बदलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे!

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande