रामनाथ कोविंद यांनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाईचे घेतले दर्शन
कोल्हापूर, 12 नोव्हेंबर, (हिं.स.)। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. कोल्हापूर विमानतळावर जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्वागत करण्यात आले. नंतर त्यांनी करवीर निवासीनी अंबाबाईचे दर्शन घेऊन विधिवत कुंकुमार्चन पूज
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद कोल्हापूरात


कोल्हापूर, 12 नोव्हेंबर, (हिं.स.)। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. कोल्हापूर विमानतळावर जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्वागत करण्यात आले. नंतर त्यांनी करवीर निवासीनी अंबाबाईचे दर्शन घेऊन विधिवत कुंकुमार्चन पूजा केली. हातकणंगले तालुक्यातील एका शैक्षणिक संकुलाच्या कार्यक्रमास उपस्थिती लावली.

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे कोल्हापूर विमानतळावर जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. आणि जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी स्वागत केले.

यावेळी पद्मश्री डॉ.विकास महात्मे, संजय घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू उद्धव भोसले, विश्वस्त विनायक भोसले, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, विमानतळ संचालक अनिल शिंदे, राधानगरी प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, करवीर तहसीलदार स्वप्नील रावडे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी त्यांना कोल्हापूर जिल्हा पर्यटन पुस्तिका भेट दिली.

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी करवीर निवासीनी अंबाबाईचे दर्शन घेऊन विधिवत कुंकुमार्चन पूजा केली. या पूजेनंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते त्यांना अंबाबाईची (महालक्ष्मी) मूर्ती, शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी रामनाथ कोविंद यांनी मंदिराच्या इतिहासाबाबत माहिती जाणून घेवून समाधान व्यक्त केले. याप्रसंगी पद्मश्री डॉ.विकास महात्मे, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, माजी राष्ट्रपतींचे खाजगी सचिव अमरीकसिंग, अतिरिक्त सचिव जसवीर चोपडा, डॉ. मनोज कुमार, पन्हाळा प्रांताधिकारी डॉ.समीर शिंगटे, सचिव शिवराज नाईकवाडे आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande