
छत्रपती संभाजीनगर, 12 नोव्हेंबर (हिं.स.)।
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे यांचे मोठे बंधू अंबादास किसनराव बागडे यांचे मंगळवारी रात्री छत्रपती संभाजीनगर येथे वृद्धापकाळाने निधन झाले. या संदर्भात माहिती मिळताच हरिभाऊ बागडे बुधवारी सकाळी जयपूरहून निघाले आणि छत्रपती संभाजीनगर येथे पोहोचत ते त्यांच्या भावाच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाले. चित्तेपिंपळगाव येथे अंबादास किसनराव बागडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
स्व.अंबादास किसनराव बागडे (दादा) यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे नाना यांचे ते जेष्ठ बंधू होते.. अशा शब्दात भाजपा आमदार चव्हाण यांनी आदरांजली वाहिली आहे. नेहमी इतरांच्या कल्याणासाठी झटण्याचा स्वभाव, प्रत्येकाशी आपलेपणाने वागणूक या त्यांच्या सुसंस्कारांचा ठसा कायम सर्वांच्या स्मरणात राहील. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. अशा शब्दात आमदार अनुराधा चव्हाण यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis