दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अमरावतीत हाय अलर्ट, शहरातील सर्वच चौकांवर नाकाबंदी
अमरावती, 12 नोव्हेंबर (हिं.स.) दिल्लीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर राज्यभरात सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्यानुसार अमरावती शहरातही पोलिसांनी हाय अलर्ट जाहीर केला आहे. शहरात येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर आणि महत्त्वाच्या चौकांवर पोलि
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अमरावतीत हाय अलर्ट  शहरातील सर्वच चौकांवर पोलिसांची नाकाबंदी


दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अमरावतीत हाय अलर्ट  शहरातील सर्वच चौकांवर पोलिसांची नाकाबंदी


अमरावती, 12 नोव्हेंबर (हिं.स.)

दिल्लीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर राज्यभरात सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्यानुसार अमरावती शहरातही पोलिसांनी हाय अलर्ट जाहीर केला आहे. शहरात येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर आणि महत्त्वाच्या चौकांवर पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी सुरू केली आहे.

दिल्लीतील घटनेनंतर राज्यातील प्रमुख शहरांमध्ये वाहनांची आणि प्रवाशांची तपासणी केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर अमरावतीतही पोलिसांनी वाहन तपासणी मोहीम हाती घेतली असून संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्यांची सखोल चौकशी करण्यात येत आहे.अमरावती पोलिसांनी शहरातील संवेदनशील ठिकाणी सुरक्षा वाढवून तपासणी मोहीम सुरू केली आहे.

बडनेरा रेल्वे स्टेशन, बडनेरा बसस्थानक, राजापेठ बसस्थानक, अमरावती रेल्वे स्टेशन आणि अमरावती बसस्थानक येथे पोलिसांनी प्रवाशांची काटेकोर तपासणी सुरू केली आहे. यावेळी बॉम्ब शोधक व नाशक पथकासोबतच श्वान पथकांचीही मदत घेऊन परिसराची झाडाझडती करण्यात येत आहे.पोलिस आयुक्तालयाच्या निर्देशानुसार नागरिकांनी कोणतीही संशयास्पद वस्तू, हालचाल किंवा व्यक्ती दिसल्यास त्वरित जवळच्या पोलिस ठाण्याला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शहरात रात्री उशिरापर्यंत ही तपासणी मोहीम सुरू राहणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande