जळगावच्या तापमानाने मोडला ७ वर्षांचा रेकॉर्ड
जळगाव , 12 नोव्हेंबर, (हिं.स.) उत्तरेकडील शीत वारे राज्याच्या दिशेने वाहत असल्याने महाराष्ट्रात थंडीची लाट कायम आहे. जळगावमध्येही मागच्या काही दिवसापासून तापमानात घट होत असून थंडीचा कडाका वाढला आहे. दरम्यान, ९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्य
जळगावच्या तापमानाने मोडला ७ वर्षांचा रेकॉर्ड


जळगाव , 12 नोव्हेंबर, (हिं.स.) उत्तरेकडील शीत वारे राज्याच्या दिशेने वाहत असल्याने महाराष्ट्रात थंडीची लाट कायम आहे. जळगावमध्येही मागच्या काही दिवसापासून तापमानात घट होत असून थंडीचा कडाका वाढला आहे.

दरम्यान, ९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली असून, यंदाच्या हिवाळी हंगामातील हे सर्वांत कमी तापमान ठरले आहे.नोव्हेंबर महिन्यात सहसा जळगावचे किमान सरासरी तापमान १४ ते १५ अंश सेल्सिअसदरम्यान असते. यापूर्वी २०१७ मध्ये नोव्हेंबर महिन्यात तापमानाचा पारा ९.४ अंशांपर्यंत खाली उतरला होता. त्यानंतर तब्बल ७ वर्षांनी, तापमानाने ९.२ अंशांचा निचांक गाठला. जळगावात आगामी काही दिवस थंडीचा कडाका कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे. मागच्या काही दिवसापासून जळगावात गारठा वाढत असून, सकाळच्या सुमारास धुक्यासह दव पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

सकाळच्या सुमारास रात्रीच्या सुमारास हुडहुडी भरणारी थंडी जाणवत असून मात्र दुपारी उन्हाचा चटका बसत असल्याने नागरिकांना उन्हाची काहिली भलतीच ताप देत आहे. भारतीय हवामान खाते आणि ममुराबाद वेधशाळेकडील नोंदीनुसार, पहाटे जळगाव शहराचे तापमान थेट ९.२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले. रात्रीच्या तापमानात अचानक झालेल्या या मोठ्या घटीमागे उत्तरेकडून येणारे थंड वारे अजूनही सक्रिय असणे हे प्रमुख कारण आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जिल्ह्यात २० ते २५ नोव्हेंबरपर्यंत थंडीचा कडाका असाच कायम राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande