शेतकऱ्यास महाबिज, राष्ट्रीय बीज निगम, कृभको आदि बियाणे मिळणार
जालना, 12 नोव्हेंबर (हिं.स.)। केंद्र पुरस्कृत योजना अन्न व पोषण सुरक्षा अभियान कडधान्य व तृणधान्य सन 2025-26 अंतर्गत प्रमाणित बियाणे वितरण बाबीमध्ये जिल्ह्यास लक्षांक प्राप्त आहे. उद्देश पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी व बियाणे बदलाचे महत्व विचारात
शेतकऱ्यास महाबिज, राष्ट्रीय बीज निगम, कृभको आदि बियाणे मिळणार


जालना, 12 नोव्हेंबर (हिं.स.)।

केंद्र पुरस्कृत योजना अन्न व पोषण सुरक्षा अभियान कडधान्य व तृणधान्य सन 2025-26 अंतर्गत प्रमाणित बियाणे वितरण बाबीमध्ये जिल्ह्यास लक्षांक प्राप्त आहे. उद्देश पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी व बियाणे बदलाचे महत्व विचारात घेता सुधारित, संकरीत वाणांचे प्रसाराच्या दृष्टीने प्रमाणित बियाणे वितरणाचा कार्यक्रम राबविणे. हरभरा पिकासाठी 10 वर्षाआतील 950 क्विंटल तसेच 10 वर्षावरील बियाणे 2472.1 क्विंटल प्रमाणित बियाणे वितरणाचा जिल्ह्यास लक्षांक प्राप्त असून 10 वर्षाआतील रु 5000 क्विंटल व 10 वर्षावरील बियाण्यास रु. 2500 क्विंटल अनुदान देय आहे. तसेच ज्वारी पिकाच्या 10 वर्षातील 270 क्विंटल तसेच 10 वर्षावरील बियाणे 700 क्विंटल प्रमाणित बियाणे वितरणाचा जिल्ह्यास लक्षांक प्राप्त असून 10 वर्षा आतील रु. 3000 क्विंटल व 10 वर्षावरील बियाण्यास रु. 1500 क्विंटल प्रमाणित बियाणे वितरण या घटकांतर्गत आर्थिक सहाय्य प्रति शेतकरी कमाल एक हेक्टरपर्यंत मर्यादित आहे. शेतकऱ्यास महाबिज, राष्ट्रीय बीज निगम, कृभको आदि बियाणे पुरवठादार संस्थेच्या वितरकामार्फत सातबारा उताऱ्याच्या आधारे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) तत्त्वावर प्रमाणित बियाणे वितरण संबंधित संस्थांनी करावे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande