
जालना, 12 नोव्हेंबर (हिं.स.)।
जालना-नांदेड प्रकल्पात भुसंपादीत होणा-या जमीनीच्या मुल्यांकनाबाबत व प्राप्त शेतक-यांच्या तक्रारीबाबत शेतक-यांशी जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आढावा बैठक घेऊन उपस्थित अधिकाऱ्यांना सुचना दिल्या.
सदरील बैठकीस जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे प्रशासक तथा उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे, उपजिल्हाधिकारी सरिता सुत्रावे, उपविभागीय अधिकारी रामदास दौंड, उपविभागीय अधिकारी पद्माकर गायकवाड, तहसीलदार छाया पवार, जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालय गहिनीनाथ कापसे, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख एम. पी. मगर, सहाय्यक संचालक नगर रचना सुमित मोराळकर यांच्या सह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मौजपुरी, धांडेगाव, राममूर्ती, रामनगर, नसडगाव,देवमूर्ती,पानशेंद्रा यासह अन्य गावातील समृद्धी बाधित शेतकऱ्यांनी आपल्या समस्या व अडचणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांना सांगितल्या. सदरील शेतकऱ्यांच्या समस्या व अडचणी तात्काळ निकाली काढण्याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी निर्देश दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis