लक्ष्य सेनचा जपान मास्टर्स २०२५ स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश
टोकियो, १२ नोव्हेंबर (हिं.स.). भारताच्या लक्ष्य सेनने चांगली कामगिरी करत जपानमधील कुमामोटो सिटी येथे सुरु असलेल्या जपान मास्टर्स २०२५ (BWF वर्ल्ड टूर सुपर ५००) बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. सातव्या मानांकित लक्ष्य सेनने स्थानिक बॅ
लक्ष्य सेन


टोकियो, १२ नोव्हेंबर (हिं.स.). भारताच्या लक्ष्य सेनने चांगली कामगिरी करत जपानमधील कुमामोटो सिटी येथे सुरु असलेल्या जपान मास्टर्स २०२५ (BWF वर्ल्ड टूर सुपर ५००) बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. सातव्या मानांकित लक्ष्य सेनने स्थानिक बॅडमिंटनपटू आणि जागतिक क्रमवारीत २६ व्या क्रमांकावर असलेल्या कोकी वतानाबेचा २१-१२, २१-१६ असा सरळ गेममध्ये पराभव केला. हा सामना फक्त ३९ मिनिटे चालला. लक्ष्य आता दुसऱ्या फेरीत कॅनडाच्या व्हिक्टर लाई किंवा सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेहशी सामना होणार आहे.

आणखी एका सामन्यात भारताच्या किरण जॉर्जला पहिल्या फेरीत पराभव सहन करावा लागला. त्याला मलेशियाच्या कोक जिंग हाँगने २२-२०, २१-१० ने पराभूत केले. त्यानंतर, पुरुष एकेरी गटाच्या पहिल्या फेरीत एचएस प्रणॉय, आयुष शेट्टी आणि तरुण मानेपल्ली हे देखील आपापले सामने खेळतील. मिश्र दुहेरीत, रोहन कपूर आणि ऋत्विका गड्डे या भारतीय जोडीने कठोर संघर्ष केला परंतु चार मॅच पॉइंट वाचवूनही, त्यांना प्रेस्ली स्मिथ आणि जेनी गाय या अमेरिकन जोडीकडून १२-२१, २१-१९, २०-२२ असा पराभव पत्करावा लागला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande