
छत्रपती संभाजीनगर, 12 नोव्हेंबर (हिं.स.)।
राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविधभागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती मनोबलामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने व नवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन दरवर्षी राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येते. अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पीकस्पर्धा सन 2025-26 साठी राज्यस्तरावरून कृषी विभागामार्फत पीक स्पर्धा जाहीर करण्यात आल्या असून त्याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. अर्ज करण्याची अंतिम दिनांक दि.31 डिसेंबर 2025 अशी आहे. असे कृषी विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
-*-*-*-*-
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis