
जळगाव, 12 नोव्हेंबर, (हिं.स.) आगामी वरणगाव नगर परिषदेच्या सार्वत्रीक निवडणुकी साठी अर्ज दाखल करणाच्या दुसऱ्या दिवशी लोकनियुक्त नगराध्यक्षासाठी पहिला अर्ज राष्ट्रवादी ( शरद पवार ) कॉग्रेसचे राजेंद्र चौधरी यांनी दाखल केला.नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळीत शहरात प्रत्येक राजकिय पक्षात नगर सेवक पदासाठी मोठया प्रमाणात इच्छुक उमेदवारांनी पक्ष निरिक्षकानी मुलाखती घेतल्या नंतर उमेदवारी कुणाच्या पदरात पडते त्यासाठी अवधी असला तरी जो तो इच्छुक उमेदवार कामाला लागला आहे. तर लोक नियुक्त नगराध्यक्ष पदासाठी प्रत्येक पक्षाकडून इच्छुकांची संख्या जास्त असली तरी पाच ते सहा उमेदवार रिंगणात असण्याची शक्यता आहे.
निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी ( शरद पवार ) कॉग्रेसचे उमेदवार राजेंद्र विश्वानाथ चौधरी यांनी त्यांच्या समर्थकासह पहिलाच अर्ज दाखल करून निवडणुकीच्या शर्यतीला केली. नगराध्यक्ष पदासाठी पक्षाकडून एकमेव त्यांचे नाव असल्याने माजी आमदार संतोष चौधरी यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली होती इतर पक्षाचे उमेदवार येता दोन चार दिवसात अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळत असुन निवडणुकीत आणखीच रंगत चाढणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर