छ. संभाजीनगर - महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवासासाठी विशेष सूट
छत्रपती संभाजीनगर, 12 नोव्हेंबर (हिं.स.)। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर हे पर्यटन राजधानी म्हणून ओळखले जाते. यामध्ये मराठवाड्यात जागतिक वारसा स्थळ म्हणून असलेले अजिंठा व वेरुळ लेणी, दौलताबाद किल्ला, घृष्णेश्वर ज्योर्तिलींग, परळी वैजनाथ, औंढा नागन
छ. संभाजीनगर - महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवासासाठी विशेष सूट


छत्रपती संभाजीनगर, 12 नोव्हेंबर (हिं.स.)। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर हे पर्यटन राजधानी म्हणून ओळखले जाते. यामध्ये मराठवाड्यात जागतिक वारसा स्थळ म्हणून असलेले अजिंठा व वेरुळ लेणी, दौलताबाद किल्ला, घृष्णेश्वर ज्योर्तिलींग, परळी वैजनाथ, औंढा नागनाथ, भद्रा मारुती मंदिर, तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदीर, मराठवाड्याच्या सीमेवर उल्कापातामुळे तयार झालेले विदर्भातील लोणार सरोवर अशाप्रकारे विविध पर्यटन स्थळे आहेत.

संपूर्ण मराठवाड्यामध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पर्यटक निवास छत्रपती संभाजीनगर, राष्ट्रकूट पर्यटक निवास वेरुळ, अजिंठा टी-पाईंट शॉपिंग प्लाझा गेस्ट हाऊस-फर्दापूर, अजिंठा पर्यटक निवास-फर्दापूर, पर्यटक निवास लोणार, पर्यटक निवास औंढा नागनाथ इत्यादी पर्यटकांना वास्तव्याकरिात पर्यटक निवास उपलब्ध आहेत. या सर्व ठिकाणच्या पर्यटक निवासामध्ये वास्तव्याकरिता महामंडळाच्या www.mtdc.co या संकेतस्थळावर ऑनलाईन आरक्षण करणे आवश्यक आहे.

ऑनलाईन आरक्षण करण्यासाठी शासकीय कर्मचाऱी व एनआय यांना 10 टक्के, 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, अपंग व माजी सैनिकांना 20 टक्के, बल्क बुकींगच्या 10 रुमसाठी 15 टक्के व 20 रुम व त्यापेक्षा जास्त रुमसाठी 20 टक्के यानुसार पर्यटकांना ऑनलाईन आरक्षण करतेवेळी आपणास लागू असलेली कोणतीही एक विशेष सूट देण्यात येत आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवासाचा सर्व संबंधितांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande