
लातूर, 12 नोव्हेंबर (हिं.स.)।
नगर परिषद व नगर पंचायत निवडणूकीच्या निवडणूक आयोगाने केलेल्या घोषणेनंतर सर्वच राजकिय पक्षांनी मतदार संघातील मतदारांचा कानोसा,इच्छुक उमेदवार चाचपणी,इच्छुक उमेदवारांचे उमेदवारी मागणी अर्ज स्वीकारणे, मुलाखती सुरू केल्या असून याकरिता प्रदेश काँग्रेस कडून निरीक्षकांच्या निवडी करण्यात आलेल्या आहेत.
लातूर जिल्ह्यातील निलंगा नगरपरिषद निवडणुकी करिता काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ,राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख, राज्याचे माजी मंत्री,स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक विभागीय प्रभारी आ.अमित विलासराव देशमुख,खा.डॉ.शिवाजी काळगे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धीरज विलासराव देशमुख व प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी बाळासाहेब देशमुख यांच्या सूचनेनुसार लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ट्वेन्टी वन शुगर्सचे व्हा.चेअरमन विजय देशमुख यांची जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी निलंगा नगर परिषद निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून निवड केली आहे.
लातूर जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकार नुसार,निलंगा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली असून,या निर्णयामुळे निवडणुकीच्या प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. विजय देशमुख यांच्या या निवडीमुळे ते पक्षातील सर्वांना सोबत घेऊन निलंगा नगर परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकावणार असा विश्वास अभय साळुंके यांनी व्यक्त केला आहे.
नगर परिषद निवडणूक काळात ट्वेन्टी वन शुगर्स चे व्हा.चेअरमन विजय देशमुख यांचा व्यवस्थापन क्षमता अनुभव ,जनसंपर्क निवडणुकीच्या कामकाजात उपयुक्त ठरू शकतो.त्यांच्या नियुक्तीमुळे निवडणुकीच्या प्रक्रियेला अधिक पारदर्शकता आणि निष्पक्षता लाभेल अशी अपेक्षा देखील व्यक्त केली जात असून निवडणुकीच्या दृष्टीने ही एक महत्त्वपूर्ण निवड मानली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis