सर्व वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट बसविणे अनिवार्य
छत्रपती संभाजीनगर, 12 नोव्हेंबर (हिं.स.)केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 50 नुसार सर्व मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (एचएसआरपी) बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. रस्ते व महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली यांनी जाहीर केलेल्
सर्व वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट बसविणे अनिवार्य


छत्रपती संभाजीनगर, 12 नोव्हेंबर (हिं.स.)केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 50 नुसार सर्व मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (एचएसआरपी) बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. रस्ते व महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली यांनी जाहीर केलेल्या जी.एस.आर.1962 (इ) दि. 04 डिसेंबर 2018 आणि जी.एस.आर. 6052 (इ) दि. 06 डिसेंबर 2018 अन्वये दि. 01 एप्रिल 2019 पासून उत्पादित सर्व नवीन वाहनांना एचएसआरपी बसविणे बंधनकारक आहे.

वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरीमुळे होणारे गुन्हे रोखणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची अचूक ओळख पटविणे तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने सर्व वाहनांवर एचएसआरपी बसविणे अत्यावश्यक असल्याचे मा. सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केले आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने दि. 01 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादित सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांनाही एचएसआरपी बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

नागरिकांनी आपल्या वाहनांसाठी एचएसआरपी प्लेटची नोंदणी आणि बुकिंग करण्यासाठी https://mhhsrp.com या अधिकृत पोर्टलवर भेट द्यावी.

जुन्या मोटार वाहनांवर सध्या वापरात असलेल्या नक्कल किंवा तत्सम दिसणाऱ्या नंबर प्लेट्स दि. 30 नोव्हेंबर 2025 पूर्वी बदलणे आवश्यक आहे. दि. 01 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी केवळ अधिकृत उत्पादकांकडून बसविण्यात आलेल्या एचएसआरपी प्लेट्स वैध मानल्या जातील व त्या वाहन पोर्टलवर नोंदविल्या जातील.

इतर कोणत्याही अनधिकृत उत्पादक किंवा पुरवठादाराकडून बसविलेल्या नंबर प्लेट्स मोटार वाहन कायदा व नियमांनुसार दंडनीय ठरतील. त्यामुळे सर्व वाहनधारकांनी आपल्या वाहनांवर निर्धारित मुदतीत अधिकृत एचएसआरपी नंबर प्लेट बसवून शासनाच्या निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

एचएसआरपी संचासह बसविण्यासाठी जीएसटी वगळून दुचाकी व ट्रॅक्टरसाठी 450 रुपये, तीन चाकीसाठी 500 रुपये व इतर वाहनासाठी 745 रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत.

एचएसआरपी उत्पादन वाहन मालकाला निवासस्थानी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी वाहनावर एचएसआरपी बसविण्याची सेवा देऊ शकतात. निवासी कल्याण संघटना, सोसायटीमध्ये शिबीर आयोजित करु शकतात. पण अशी सुविधा ही वाहन मालकाच्या ऐच्छिक राहील. कोणत्याही परिस्थितीत नियुक्त केलेले अधिकृत एचएसआरपी फिटमेंट केंद्रावर मालकांना एचएसआरपी बसविण्याची सेवा नाकारता येणार नाही.

हिंगोली जिल्ह्यात हिंगोली येथे 5, कळमनुरी येथे 2, वसमत येथे 3 व सेनगाव येथे 01 एचएसआरपी सेंटर कार्यान्वित आहेत. जिल्हृयातील संबंधित वाहनधारकांनी आपल्या वाहनांचे एचएसआरपी नंबर प्लेट वेळेत बसवून घ्यावेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande