
नवी दिल्ली , 12 नोव्हेंबर (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (दि.१२) थिम्पू येथे भुटानचे माजी राजा आणि चौथे नरेश जिग्मे सिंग्ये वांगचुक यांची भेट घेतली. त्यांनी ‘वैश्विक शांती प्रार्थना महोत्सवा’तील कालचक्र अनुष्ठानातही सहभाग घेतला. कालचक्र समारंभ तिबेटी बौद्ध धर्माशी संबंधित आहे, ज्याचा अर्थ ‘वेळेचा चक्र’ असा होतो. कालचक्राला बौद्ध धर्माचा महाकुंभ असेही म्हटले जाते,ज्यामध्ये सर्वजण एकत्र येऊन जगाच्या शांततेसाठी प्रार्थना करतात. कालचक्र समारंभात विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते.
पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर महोत्सवाचे फोटो शेअर करत लिहिले, “महामहिम चौथे नरेश यांच्या उपस्थितीत कालचक्र — ‘समय का चक्र’ — समारंभाचे उद्घाटन करण्याचा मला सन्मान मिळाला. याचे अध्यक्षस्थान परम पावन जे खेनपो यांनी भूषविले, ज्यामुळे हा कार्यक्रम अधिक विशेष झाला. हा जगभरातील बौद्धांसाठी महान सांस्कृतिक महत्त्व असलेला एक पवित्र अनुष्ठान आहे. कालचक्र सशक्तीकरण हा चालू असलेल्या ‘वैश्विक शांती प्रार्थना महोत्सवा’चा एक भाग आहे, ज्याने भुटानमध्ये बौद्ध धर्माचे भक्त आणि विद्वानांना एकत्र आणले आहे.”
पंतप्रधान मोदी यांनी महामहिम चौथे नरेश यांच्या 70व्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देत भारत सरकार आणि जनतेतर्फे त्यांच्या उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना व्यक्त केली. त्यांनी भारत-भुटान मैत्री अधिक मजबूत करण्यासाठी त्यांच्या नेतृत्व, मार्गदर्शन आणि सल्ल्याबद्दल चौथे नरेश यांचे आभार मानले. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंध आणि परस्पर हिताच्या विषयांवर चर्चा केली. या संदर्भात त्यांनी दोन्ही देशांमधील आध्यात्मिक आणि सांस्कृतिक नात्यांवर भर दिला, जे भारत आणि भुटानच्या लोकांना अधिक जवळ आणतात.
पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर चौथे नरेश यांच्यासोबत झालेल्या भेटीचा फोटो शेअर करत लिहिले,“महामहिम चौथे नरेश यांच्यासोबत अतिशय चांगली बैठक झाली. गेल्या काही वर्षांत भारत-भुटान संबंध दृढ करण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांचे मी कौतुक केले. ऊर्जा, व्यापार, तंत्रज्ञान आणि संपर्क क्षेत्रांतील सहकार्यावर चर्चा झाली. गेलेफू माइंडफुलनेस सिटी प्रकल्पाच्या प्रगतीचेही मी कौतुक केले, जो आमच्या ऍक्ट ईस्ट पॉलिसीशी सुसंगत आहे.” यापूर्वी मंगळवारी पंतप्रधान मोदी यांनी भुटानच्या चौथ्या नरेशांच्या 70व्या जयंतीनिमित्त आयोजित समारंभातही सहभाग घेतला आणि भारत व भुटानमधील चिरंतन मैत्री आणि आध्यात्मिक संबंधांची पुन:पुष्टी केली.
पंतप्रधान मोदी आणि भुटानचे विद्यमान नरेश जिग्मे खेसर नामग्येल वांगचुक यांनी ऊर्जा, क्षमता निर्माण, संपर्क, तंत्रज्ञान, संरक्षण आणि सुरक्षासह सहकार्याच्या विस्तृत क्षेत्रांवर सविस्तर चर्चा केली. प्रतिनिधीमंडळस्तरीय चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्तपणे 1020 मेगावॅट पुनात्सांगछू-II जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटन केले, जो भारत आणि भुटान यांच्यातील प्रमुख सहकार्याचे प्रतीक असून दोन्ही देशांतील वाढत्या ऊर्जा भागीदारीला अधोरेखित करतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode