परळी गेवराई नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
बीड, 12 नोव्हेंबर (हिं.स.)।बीड जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी २ तर नगरसेवकपदासाठी ३ अर्ज आले आहेत. बीड पालिकेत एकही अर्ज दाखल करण्यात आला नाही. गेवराई नगरपालिकेत नगराध्यक्षपदासाठी संदीप चाळक यांनी अर्ज दाखल केला आहे. परळीत नगर
अ


बीड, 12 नोव्हेंबर (हिं.स.)।बीड जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी २ तर नगरसेवकपदासाठी ३ अर्ज आले आहेत. बीड पालिकेत एकही अर्ज दाखल करण्यात आला नाही.

गेवराई नगरपालिकेत नगराध्यक्षपदासाठी संदीप चाळक यांनी अर्ज दाखल केला आहे. परळीत नगराध्यक्षपदासाठी सय्यद

रशिदाबी शफाकत अली तर प्रभाग क्रमांक ३ मधून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून सय्यद रशिदाबी शफाकत अली, प्रभाग क्रमांक १६ मधून सर्वसाधारण प्रवर्गातून कमलबाई बागवाले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. माजलगाव पालिकेत राष्ट्रवादीच्या राहुल सुखदेव लंगडे यांनी नगरसेवक पदासाठी १ अर्ज दाखल केला आहे.जिल्ह्यात बीडसह सहा पालिकांच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. बीड नगरपालिका ही २५ वॉडाँची असून, येथे ५१ नगरसेवक निवडून येणार आहेत. ८ वर्षांपासून निवडणूकच झाली नसल्याने इच्छुकांची गर्दी आहे. बीड पालिकेत बे-बाकी प्रमाणपत्र काढण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande