
अमरावती, 12 नोव्हेंबर (हिं.स.) | गत दोन ते तीन दिवसापासून जिल्ह्यासह तालुक्यात पारा घसरल्याने थंडीची लाट पसरली आहे. त्यामुळे गावा-गावात सायंकाळी शेकोट्या पेटलेल्या आढळून येत आहे. सध्या स्थानिक निवडणुकीची चाहूल लागल्याने शेकोट्यांवर चांगल्याच राजकीय रंगलेल्या आहेत.
पावसाळा व उन्हाळा अचानक बेपत्ता होताच मध्य प्रदेशातून थंड वाऱ्याने मेळघाटात दस्तक देऊन जनजीवन विस्कळीत करून टाकले आहे. रविवार सकाळी न्यूनतम तापमान ११ डिग्री सेल्सियस नोंदविल्या गेल्याने लवकरच शीतलहर येण्याचे संकेत मिळालेले आहेत. मध्यप्रदेशातील इन्दौर, खंडवा आणि बऱ्हाणपूर या शहरांकडून धारणीत थंड हवेने शिरकाव करताच मेळघाटला थंडीचा फटका बसलेला आहे. थंडी सुरू झाल्याने शेतकरी मात्र सुखावलेला आहे. कारण आता अवकाळी पावसाचा धोका होण्याची चिंता नाही. रब्बी पिकाची पेरणी आता आटोपली असून खरीप पिके गमावलेल्यांना हरभरा, ऊस, गहू आणि तूर पिकाची आस लागलेली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी