


नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर (हिं.स.)। राष्ट्रपती जोआओ मॅन्युएल गोंकाल्विस लॉरेन्को यांच्या निमंत्रणावरून, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अंगोलाच्या स्वातंत्र्याच्या पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित समारंभात सहभाग घेतला.
लुआंडातील प्राका दा रिपब्लिका येथे आयोजित केलेल्या या विविधरंगी समारंभात, राष्ट्रपती मुर्मू यांनी राष्ट्रपती लॉरेन्को यांच्यासोबत अंगोलाच्या लष्करी आणि सांस्कृतिक परंपरांचे एक आकर्षक सादरीकरण पाहिले.
आफ्रिकेच्या दोन देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे बोत्सवानाच्या गॅबरोन येथील सर सेरेत्से खामा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले .बोत्सवानाचा भारतीय राष्ट्रपतींचा हा पहिलाच राजकीय दौरा आहे.
भारत-बोत्स्वाना मैत्रीची गहनता प्रतिबिंबित करत बोत्सवानाचे अध्यक्ष महामहिम अधिवक्ता डुमा गिडॉन बोको यांनी विमानतळावर राष्ट्रपतींचे खास औपचारिक पध्दतीने स्वागत केले आणि त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule