प्रवक्तेपदावरून उचलबांगडी होताच रुपाली पाटील-ठोंबरे यांच्यावर गुन्हा दाखल
पुणे, 12 नोव्हेंबर (हिं.स.)। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधील दोन महिला पदाधिकाऱ्यांमधील वाद गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या पदाधिकारी असलेल्या रुपाली पाटील ठोंबर
प्रवक्तेपदावरून उचलबांगडी होताच रुपाली पाटील-ठोंबरे यांच्यावर गुन्हा दाखल


पुणे, 12 नोव्हेंबर (हिं.स.)। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधील दोन महिला पदाधिकाऱ्यांमधील वाद गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या पदाधिकारी असलेल्या रुपाली पाटील ठोंबरे यांचे प्रवक्ते पद काढून घेतला असल्याचे देखील बोलले जात आहे. त्यातच आता रूपाली ठोंबरे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. एका प्रकरणामध्ये रूपाली ठोंबरे यांच्यावर गुन्हा दाखल झाले असल्याचे समोर आले आहे.काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर आणि नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांच्यातील वाद संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला आहे. फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात चाकणकर यांनी पीडितेचे चरित्रहनन केल्याचा आरोप ठोंबरे यांनी केला होता. यानंतर पक्षाने ठोंबरे यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आणि त्यांच्या प्रवक्तेपदावरून काढून टाकले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande