नांदेड : किमान आधारभूत दराने शेतमालाची खरेदीसाठी नोंदणी सुरू
नांदेड, 12 नोव्हेंबर (हिं.स.)।केंद्र शासनाच्या किमान आधारभूत योजनेअंतर्गत सन 2025-26 मध्ये किमान आधारभूत दराने सोयाबीन, मूग व उडिद खरेदीस केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी ई-पीक पाहणी वरील नोंद, 7/12, आधारका
Q


नांदेड, 12 नोव्हेंबर (हिं.स.)।केंद्र शासनाच्या किमान आधारभूत योजनेअंतर्गत सन 2025-26 मध्ये किमान आधारभूत दराने सोयाबीन, मूग व उडिद खरेदीस केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी ई-पीक पाहणी वरील नोंद, 7/12, आधारकार्ड, आधारलिंक बँक खाते इत्यादी आवश्यक कागदपत्रानुसार आपल्या गावाजवळील नाफेडच्या नजीकच्या खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करून घ्यावी अथवा NAFED ई-समृध्दी या मोबाईल ॲपद्वारे स्वंनोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था शाहूराज हिरे यांनी केले आहे.

या खरेदी केंद्रावर फक्त एफएक्यु दर्जाचा शेतमालाची खरेदी होणार असल्याने शेतकऱ्यांनी खरेदीसाठी एसएमएस प्राप्त झाल्यानंतर शेतमाल स्वच्छ व चाळणी करून खरेदी केंद्रावर आणण्याची दक्षता घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात 18.50 लाख मे.टन सोयाबीन, 33 हजार मे. टन मूग व 3.25 लाख मे. टन उडीद खरेदीस मंजूरी दिली आहे. नांदेड जिल्ह्यात नाफेडमार्फत सोयाबीन खरेदी होणार असून महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई. (DMO) (केंद्र–14), विदर्भ सहकारी पणन महासंघ नागपूर. (VCMF) (केंद्र–1) व महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ पुणे (MSAMB) (केंद्र–18) असे एकूण 33 खरेदी केंद्राला मान्यता मिळालेली आहे.

नांदेड जिल्ह्यातील खरेदी केंद्र

खरेदी करणाऱ्या सब सेंटरचे नाव व खरेदी केंद्राचे ठिकाण याप्रमाणे आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई. (DMO) अंतर्गत नांदेड जिल्हा फळे व भाजीपाला सहकारी खरेदी विक्री संस्था- खरेदी केंद्राचे ठिकाण अर्धापूर.

·तालुका सहकारी खरेदी विक्री संघ म. मुखेड- खरेदी केंद्राचे ठिकाण मुखेड.

· तालुका सहकारी खरेदी विक्री संघ म. हदगाव- खरेदी केंद्राचे ठिकाण हदगाव.

·तालुका सहकारी खरेदी विक्री संघ म. बिलोली- खरेदी केंद्राचे ठिकाण कासराळी.

· पंडित दिनदयाळ अभिनव सहकारी संस्था म. देगलूर- खरेदी केंद्राचे ठिकाण देगलूर.

·तालुका सहकारी खरेदी विक्री संघ म. लोहा- खरेदी केंद्राचे ठिकाण लोहा.

·किनवट तालुका कृषिमाल प्रक्रिया सहकारी संस्था म. किनवट- खरेदी केंद्राचे ठिकाण गणेशपुर.

·अष्टविनायक सहकारी संस्था म. हदगाव- खरेदी केंद्राचे ठिकाण मानवाडी फाटा.

· कुंडलवाडी विविध कार्यकारी सेवा सह. संस्था- खरेदी केंद्राचे ठिकाण कुंडलवाडी.

· बळीराम पाटील फळे व भाजीपाला प्रक्रीया सहकारी संस्था मुखेड- खरेदी केंद्राचे ठिकाण बेरली खुर्द.

· मुखेड फळे व भाजीपाला उत्पादक सहकारी संस्था- खरेदी केंद्राचे ठिकाण उमरदरी.

· जय महाराष्ट्र शेतीमाल खरेदी विक्री सह. संस्था नांदेड- खरेदी केंद्राचे ठिकाण कौठा.

· स्वामी विवेकानंद अभिनव सहकारी संस्था मर्यादित- खरेदी केंद्राचे ठिकाण शेळगाव थडी.

· महात्मा बसवेश्वर ग्रामीण विकास मंडळ बाबशेटवाडी मुखेड- खरेदी केंद्राचे ठिकाण मुक्रामाबाद याप्रमाणे आहेत.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande