रोहित आणि कोहलीला एकदिवसीय संघात राहण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागणार
नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर (हिं.स.)बीसीसीआयने रोहित शर्मा आणि विराट कोहलीला एकदिवसीय संघात राहण्यासाठी देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळण्याचा सल्ला दिला आहे. रोहितने २४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीसाठी त्याच्या उपलब्धतेची माहिती मुंबई क्र
रोहित शर्मा आणि विराट कोहली


नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर (हिं.स.)बीसीसीआयने रोहित शर्मा आणि विराट कोहलीला एकदिवसीय संघात राहण्यासाठी देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळण्याचा सल्ला दिला आहे. रोहितने २४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीसाठी त्याच्या उपलब्धतेची माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशनला दिली आहे.पण विराट कोहलीने अद्याप दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनला स्पर्धेत त्याच्या सहभागाबद्दल माहिती दिलेली नाही. विराटने विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याच्या सहभागाबाबत अद्याप कोणताही संदेश पाठवलेला नाही. ही स्पर्धा २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे संघ निवडीपूर्वी तो डीडीसीएला कळवण्याची शक्यता आहे.

गेल्या महिन्यात कोहली आणि रोहित ऑस्ट्रेलियात झालेल्या एकदिवसीय मालिकेत खेळले होते. दोघेही जवळजवळ सात महिन्यांनंतर भारतीय संघात परतले होते. त्या मालिकेच्या अंतिम सामन्यात दोन्ही दिग्गज फलंदाजांमध्ये विजयी भागीदारी रचली होती. रोहितने तीनपैकी दोन सामन्यांमध्ये शानदार कामगिरी केली, तिसऱ्या सामन्यात शतक झळकावले, तर पहिल्या दोन सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर कोहलीने पुनरागमन करत नाबाद ८७ धावा केल्या होत्या.

बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनाने दोन्ही क्रिकेटपटूंना स्पष्टपणे सांगितले आहे की, जर त्यांना भारतासाठी खेळणे सुरू ठेवायचे असेल तर त्यांनी देशांतर्गत क्रिकेट खेळले पाहिजे. दोन्ही क्रिकेटपटूंनी दोन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली असल्याने, सामना तंदुरुस्ती राखण्यासाठी देशांतर्गत सामन्यांमध्ये भाग घेणे आवश्यक आहे.

रोहित आणि कोहलीने २०२४ च्या टी२० विश्वचषकानंतर टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर, २०२४-२५ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर त्यांनी कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली. सध्या रोहित मुंबईतील शरद पवार इनडोअर अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे, तर कोहली आपला बहुतेक वेळ लंडनमध्ये त्याच्या कुटुंबासोबत घालवत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande