जी-७ बैठकीला उपस्थित राहण्यासाठी एस जयशंकर कॅनडामध्ये दाखल
नवी दिल्ली , 12 नोव्हेंबर (हिं.स.)।भारतीय परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर जी-7 देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी कॅनडाला पोहोचले आहेत. कॅनडातील नायगरा येथे जयशंकर यांनी विविध देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांसोबत द्विपक्षीय बैठक घ
जी-७ बैठकीला उपस्थित राहण्यासाठी एस जयशंकर कॅनडामध्ये दाखल


नवी दिल्ली , 12 नोव्हेंबर (हिं.स.)।भारतीय परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर जी-7 देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी कॅनडाला पोहोचले आहेत. कॅनडातील नायगरा येथे जयशंकर यांनी विविध देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांसोबत द्विपक्षीय बैठक घेतली आणि परस्पर सहकार्य वाढविण्याबाबत चर्चा केली.

डॉ. एस. जयशंकर यांनी कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री अनीता आनंद यांच्यासोबतही द्विपक्षीय भेट घेतली. या भेटीनंतर परराष्ट्रमंत्र्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले, “आज कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री अनीता आनंद यांना भेटून आनंद झाला. जी-7 परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. ‘नवीन रोडमॅप 2025’ लागू करण्यातील प्रगतीचे कौतुक केले. आमच्या द्विपक्षीय भागीदारीच्या आणखी बळकटीकरणाची अपेक्षा आहे.”

डॉ. जयशंकर यांनी कॅनडामध्ये मेक्सिकोचे परराष्ट्रमंत्री डॉ. जुआन रामोन दे ला फुएंते यांचीही भेट घेतली. या भेटीनंतर एका पोस्टमध्ये जयशंकर यांनी लिहिले, “मेक्सिकोचे परराष्ट्रमंत्री डॉ. जुआन रामोन दे ला फुएंते यांना भेटून आनंद झाला. व्यापार, वाणिज्य, आरोग्य आणि औषधनिर्माण तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आमच्या सहकार्याचा अधिक विस्तार करण्यावर चर्चा झाली.”याशिवाय, डॉ. जयशंकर यांनी जर्मनी, फ्रान्स आणि ब्राझीलच्या त्यांच्या समकक्ष परराष्ट्रमंत्र्यांशीही भेट घेतली. सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये जयशंकर यांनी सांगितले की, जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्यांसोबत धोरणात्मक भागीदारी मजबूत करणे, भारत-युरोपियन युनियन संबंध अधिक दृढ करणे, तसेच पश्चिम आशिया, अफगाणिस्तान आणि हिंद-प्रशांत महासागर क्षेत्राविषयी चर्चा झाली.डॉ. जयशंकर यांनी फ्रान्सच्या परराष्ट्रमंत्र्यांसोबतही धोरणात्मक भागीदारी आणि द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यावर चर्चा केली. ब्राझीलच्या परराष्ट्रमंत्र्यांसोबत गुंतवणूक, आरोग्य आणि तांत्रिक सहकार्यावर विचारविनिमय झाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande