पाथरी : सईद चाऊस आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते शिवसेनेत
परभणी, 12 नोव्हेंबर (हिं.स.)।पाथरी शहरात शिवसेनेचा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. शहरातील सामाजिक कार्यकर्ते सईद चाऊस आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते यांनी शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्
अ


परभणी, 12 नोव्हेंबर (हिं.स.)।पाथरी शहरात शिवसेनेचा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. शहरातील सामाजिक कार्यकर्ते सईद चाऊस आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते यांनी शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

या प्रवेशामुळे पाथरी शहरातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाली असून, नागरिकांचा विश्वास आणखी दृढ झाला आहे. शिवसेनेचा जनाधार विस्तारत असताना, स्थानिक पातळीवर युवकांमध्ये नवउमेद आणि नवउत्साह निर्माण झाला आहे. आगामी काळात पाथरी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना अधिक जोमाने, योजनाबद्ध पद्धतीने आणि जनतेच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून कार्यरत राहिल. सईद चाऊस आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा पक्षप्रवेश म्हणजे पाथरीच्या विकासाच्या वाटचालीला नवे बळ आणि नवा वेग मिळण्याची खात्री आहे.

----------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande