पाथरीत उद्धव नाईक यांनी केला शिवसेनेत प्रवेश
परभणी, 12 नोव्हेंबर (हिं.स.)। परभणी भाजपाच्या किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष उद्धव नाईक यांनी आपल्या असंख्य सहकाऱ्यांसह व कार्यकर्त्यांसह पाथरी येथे राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, शिवसेना अल्
अ


परभणी, 12 नोव्हेंबर (हिं.स.)। परभणी भाजपाच्या किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष उद्धव नाईक यांनी आपल्या असंख्य सहकाऱ्यांसह व कार्यकर्त्यांसह पाथरी येथे राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

नाईक हे गेल्या वीस वर्षांपासून समाजकार्यात सक्रियपणे कार्य करत, शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने लढा देत आहेत. त्यांच्या या दीर्घ सामाजिक कार्यामुळे त्यांनी जनतेमध्ये भक्कम असा जनसंपर्क निर्माण केला आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशामुळे पाथरी तालुक्यात शिवसेनेच्या जनाधारात आणि मताधिक्यात लक्षणीय वाढ होईल, हे निश्चित झाले आहे.

या प्रवेशामुळे पाथरी शहरासह संपूर्ण परिसरात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाली आहे. स्थानिक पातळीवर पक्षाची पकड मजबूत होत असून, नागरिकांचा विश्वास शिवसेनेकडे दृढपणे जोडला जातं आहे. विशेषतः युवक वर्गामध्ये नवचैतन्य आणि उत्साह निर्माण झाला असून, आगामी काळात शिवसेना पाथरी शहर व तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक जोमाने आणि जबाबदारीने कार्यरत राहणार आहे. ही समाजासाठी आणि शिवसेनेसाठी आनंदाची बाब आहे. असे सईद खान यांनी म्हटले आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande