
गुटखा वाहतुकीसाठी कंटनेरचा वापर
अमरावती, 12 नोव्हेंबर (हिं.स.)। शिरखेड पोलिसांनी मंगळवारी अमरावती ते मोर्शी मार्गावरील शिरखेड फाट्यावर कंटेनरमधून प्रतिबंधक गुटखा व तंबाखुजन्य पदार्थं वाहतुकीचा प्रकार उघडकीस आणला. पोलिसांनी कंटेनरसह गुटखा असा एकूण १ कोटी २२ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच गुन्हा नोंदवून चालकाला अटक केली. राहुल भब्बल (वय ३२ रा. गवालदा, राजस्थान) असे चालकाचे नाव आहे.
मोर्शी येथून कंटेनर क्र. आरजे १४ जीएल ००२० मध्ये मोठ्या प्रमाणात सुगंधित गुटखा अमरावतीच्या दिशेने जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी शिरखेड फाट्यावर सापळा रचला. काही वेळात कंटेनर येताच त्याची पाहणी केली. कंटेनरमध्ये 108 मोठ्या प्रमाणत प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखु दिसला.७७ लाख ३५ हजार रुपयांचा गुटखा आणि कंटेनर असा एकूण १ कोटी २२ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त व चालकाला अटक केली. तसेच चालकासह ज्या व्यक्तीकडून गुटखा आणला आणि ज्या व्यक्तीकडे घेऊन जात होता अशा तीन व्यक्तींविरुध्द गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी