लातुर : वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते विलास साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू
लातूर, 12 नोव्हेंबर (हिं.स.)।विलास सहकारी साखर कारखाना लिमिटेड, वैशालीनगर, निवळी येथील गळीत हंगाम सन २०२५-२६ चा शुभारंभ करण्यात आला. कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते आणि सर्व संचालकांच्या उपस्थितीत गव्हाणीत उस
अ


लातूर, 12 नोव्हेंबर (हिं.स.)।विलास सहकारी साखर कारखाना लिमिटेड, वैशालीनगर, निवळी येथील गळीत हंगाम सन २०२५-२६ चा शुभारंभ करण्यात आला.

कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते आणि सर्व संचालकांच्या उपस्थितीत गव्हाणीत उसाची मोळी टाकून या हंगामाचा विधिवत शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी गव्हान पूजनही करण्यात आले.

लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रेरणेतून उभा राहिलेला विलास सहकारी साखर कारखाना माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या नियोजनानुसार, माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख, माजी आमदार धीरज विलासराव देशमुख आणि कारखान्याचे अध्यक्षा श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करत आहे.प्रारंभी गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगीची सत्यनारायण पुजा संचालक शाम बरुरे व सौ. पुनम बरुरे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी व्हाईस चेअरमन वैजनाथराव शिंदे, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., चे व्हाईस चेअरमन अशोक काळे, माजी चेअरमन धनंजय देशमुख, डॉ. सारीका देशमुख, ऊस उत्पादक सभासद तसेच सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख व कर्मचारी आदी मोठया संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande