अमरावतीत थंडीचा जोर वाढला; उबदार कपड्यांची खरेदी वाढली
अमरावती, 12 नोव्हेंबर (हिं.स.)। दरवर्षीच्या तुलनेत यंदा थंडीचा जोर जास्तच जाणवू लागला आहे. सायंकाळी व सकाळच्या सुमारास तपमानाचा पारा घसरत असल्याने नागरिकांनी ठेवणीतील उबदार करडे बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. अनेक नवनवीन डिझाईन्सच्या उबदार कपड्या
अमरावतीत उबदार फॅशनचा जलवा, मखमली स्टोल्सची क्रेझ वाढली


अमरावती, 12 नोव्हेंबर (हिं.स.)। दरवर्षीच्या तुलनेत यंदा थंडीचा जोर जास्तच जाणवू लागला आहे. सायंकाळी व सकाळच्या सुमारास तपमानाचा पारा घसरत असल्याने नागरिकांनी ठेवणीतील उबदार करडे बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. अनेक नवनवीन डिझाईन्सच्या उबदार कपड्यांसह विविध फॅशनच्या मफलर व मखमली स्टॉल्सच्या खरेदीचा सध्या ट्रेण्ड दिसून येत आहे.

थंडीची चाहूल लागताच विविधरंगी उबदार कपडे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. नागरिकांकडून उबदार कपड्यांना मागणी वाढू लागली आहे. शहरातील बाजारपेठेसह रेल्वे स्थानकासमोरील रस्त्यावर असलेल्या दुकानांमध्ये गरम कपडे खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.

नेहरू, राजकमल, इतवारा, मोची गल्ली , अंबादेवी मंदिर परिसर, जवाहर रोड, बाजारपेठेमध्ये स्वेटर, जॅकेट, कान टोपी, हातमोजे, पायमोजे, महिलांचे स्वेटर अशा विविध प्रकारच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे. लहान मुलांच्या हातमोज्यांपासून ते विविध लहान-लहान सुंदर बंद गळ्याचे जॅकेट्स बाजारात उपलब्ध आहेत. मुलांचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी मऊ कापसाचे सुंदर स्वेटर आणि क्विक ड्रायची खरेदी केली जात आहे.

फॅन्सी स्वेटर १,०५० रु. , लोकरी स्वेटर ४५० - ५०० रु. , साधे स्वेटर ४०० ते ४५०, फॅन्सी लेडीज स्वेटर १,५००- ३००० रु. पेक्षा जास्त, पुरुषांचे स्वेटर २,१०० ते ४ हजार पेक्षा जास्त, जॅकेट ७५०, १५००, २००० त्यापेक्षाही पुढे, हातमोजे ५०, कानटोपी ८०, लहान मुलांचे स्वेटर ३५० रु. अश्या किमती बाजारात पाहायला मिळत आहेत.

मुलांना कार्टुनची भुरळ तरुणाईला उबदार कपड्यांमध्ये फॅशनचा ट्रेण्डही हवा असल्याने स्वेट शर्ट, विंटर कोट, कॉटन जॅकेट्स, कानपट्टी या प्रकारांना तरुणाईची मागणी आहे. मुलांसाठी हुडीज, कार्टूनचे चित्र असलेले, चेन असलेल्या स्वेटरला यंदा जास्त मागणी असल्याचे चित्र दिसून येत आहे. थंडीमध्ये लहान मुले व ज्येष्ठांची जास्त काळजी घेतली जाते. अगदी पायाच्या नखापासून ते डोक्यापर्यंत लोकरीचे कपडे परिधान केले जातात. खासकरून विविध रंगसंगती असलेली वस्त्रे वापरण्याकडे महिलांचा कल वाढू लागला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande