अक्कलकोट येथे  वटवृक्ष मंदिर, अन्नछत्र मंडळ परिसरातील गर्दीच्या ठिकाणांवर लक्ष
सोलापूर, 12 नोव्हेंबर (हिं.स.)। दिल्ली येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभर हाय अलर्ट देण्यात आला आहे. अक्कलकोट येथे मोठ्या प्रमाणात होत असलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर आज वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर, अक्कलकोट बसस्थ
अक्कलकोट येथे  वटवृक्ष मंदिर, अन्नछत्र मंडळ परिसरातील गर्दीच्या ठिकाणांवर लक्ष


सोलापूर, 12 नोव्हेंबर (हिं.स.)। दिल्ली येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभर हाय अलर्ट देण्यात आला आहे. अक्कलकोट येथे मोठ्या प्रमाणात होत असलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर आज वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर, अक्कलकोट बसस्थानक व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ या ठिकाणी पोलिस पथक व श्र्वानपथकाच्या मदतीने तपासणी करण्यात आली.

पुढील दोन-तीन दिवस ही तपासणी कायम राहणार असल्याचे संकेत पोलिस खात्याने दिले आहे.दिल्लीत घडलेल्या दहशतवादी घटनेच्या पार्श्वभूमीवर गर्दी होणाऱ्या ठिकाणी स्फोटके शोध व नष्ट पथकाकडून श्वान पथकासह कडक तपासणी करण्यात आली. त्यांच्याकडील साहित्याचा वापर करून बॉम्बसदृश वस्तू कुठे आहे का? याची तपासणी करण्यात आली. तसेच मंदिराबाहेरील परिसर, बसस्थानक परिसर तसेच अन्नछत्र मंडळाच्या बाहेरील बाजूस या पथकाने तपासणी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande