अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे महामंडळाचे आवाहन
सोलापूर, 12 नोव्हेंबर (हिं.स.)। अलीकडील काही दिवसांपासून मराठा समाजातील बेरोजगार युवकांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत महामंडळाचे कामकाज बंद झाले आहे, व्याज परतावा थांबविण्यात आला आहे अशा प्र
अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे महामंडळाचे आवाहन


सोलापूर, 12 नोव्हेंबर (हिं.स.)। अलीकडील काही दिवसांपासून मराठा समाजातील बेरोजगार युवकांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत महामंडळाचे कामकाज बंद झाले आहे, व्याज परतावा थांबविण्यात आला आहे अशा प्रकारच्या निराधार अफया काही व्यक्तींकडून सोशल मीडियासह विविध माध्यमातून पसरवल्या जात आहेत. या अफवांना कोणातेही तथ्य नसून, महामंडळाचे नवीन पात्रता प्रमाणपत्र देण्याचे काम वगळता इतर सर्व कामकाज सुरळीतपणे सुरु असल्याचे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. या अनुषंगाने खालील बाबी सर्वसामान्यांना कळविण्यात येत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande