
इस्लामाबाद, 12 नोव्हेंबर (हिं.स.)पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेचा ६ धावांनी पराभव केला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. श्रीलंकेसमोर विजयासाठी ३०० धावांचे लक्ष्य होते. पण त्यांचा संपूर्ण संघ निर्धारित ५० षटकांत केवळ २९३ धावाच करू शकला. अशाप्रकारे, पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेचा ६ धावांनी पराभव केला. पाकिस्तानच्या विजयाचे खरे हिरो सलमान आगा आणि हरिस रौफ होतेय त्यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांची मने जिंकली. श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंकाने नाणेफेक जिंकून पाकिस्तानविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना, पाकिस्तानने निर्धारित ५० षटकांत ५ गडी गमावून २९९ धावा केल्या. पाकिस्तानकडून सॅम अयुब आणि फखर झमान यांनी डावाची सुरुवात केली. सॅम १४ चेंडूत ६ धावा देऊन स्वस्तात बाद झाला. दरम्यान, फखरने ५५ चेंडूत ३२ धावा केल्या, ज्यामध्ये दोन चौकार आणि एक षटकार होता. बाबर आझमने ५१ चेंडूत २९ धावा केल्या, ज्यामध्ये तीन चौकार होते. तो वानिंदू हसरंगाने बोल्ड झाला. यष्टिरक्षक मोहम्मद रिझवानने फक्त ५ धावा केल्या आणि हसरंगाने त्याला एलबीडब्ल्यू देखील केले. पाकिस्तानकडून फक्त सलमान आघाने शानदार शतक झळकावले. सलमानने ८७ चेंडूंचा सामना केला. त्याने नऊ चौकार मारले आणि नाबाद १०५ धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट १२० होता. हुसेन तलतनेही ६२ धावा केल्या. मोहम्मद नवाज देखील ३६ धावांवर नाबाद राहिला. दरम्यान, श्रीलंकेच्या संघाकडून असिथा फर्नांडोने दोन विकेट्स घेतल्या. तर दुष्मंथा चामीरा यांनी एकके विकेट घेतला. ३०० धावांचा पाठलाग करताना, पथुम निस्सांका आणि कामिल मिशारा यांनी चांगली सुरुवात केली. पण ते हरिस रौफला रोखू शकले नाहीत. पथुमने २९ धावा केल्या, तर कामिलने ३८ धावा केल्या. यष्टिरक्षक कुसल मेंडिस आपले खाते उघडू शकले नाहीत. तो हरिस रौफच्या गोलंदाजीवक बाद झाला. सदीरा समरविक्रमाने ३९ धावा केल्या आणि कर्णधार चारिथ असलंकाने ३२ धावा करून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. जानिथ लियानागेने २८ धावा केल्या. वानिंदू हसरंगाने ५२ चेंडूत ५९ धावा केल्या, परंतु श्रीलंकेला ५० षटकांत ९ गडी गमावून फक्त २९३ धावा करता आल्या. पाकिस्तानकडून हरिस रौफने चार विकेट घेतल्या. नसीम शाह आणि फहीम अश्रफ यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या, तर मोहम्मद नवाजने एक विकेट घेतली.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे