पाथरी नगरपालिकेत नगराध्यक्षपदासाठी 1 व सदस्य पदाकरीता 4 उमेदवारी अर्ज दाखल
परभणी, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। पाथरी येथील नगरपालिका निवडणूकीकरीता आज गुरुवारी तीसर्‍या दिवसापर्यंत एकूण नगराध्यक्षपदासाठी 1 व सदस्य पदाकरीता 4 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. 10 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली. त्या
पाथरी नगरपालिकेत नगराध्यक्षपदासाठी 1 व सदस्य पदाकरीता 4 उमेदवारी अर्ज दाखल


परभणी, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। पाथरी येथील नगरपालिका निवडणूकीकरीता आज गुरुवारी तीसर्‍या दिवसापर्यंत एकूण नगराध्यक्षपदासाठी 1 व सदस्य पदाकरीता 4 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे.

10 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली. त्या दिवशी एकाही उमेदवााने अर्ज दाखल केला नाही. 11 नोव्हेंबर रोजी प्रभाग क्रमांक 10 अ मधून राजेश मंगल पाटील, प्रभाग क्रमांक 12 मधून शेख खदीर शेख खाजा यांनी नगराध्यक्षपदासाठी तर दुर्राणी अब्दुल हन्नान खान अब्दुल मजीद खान यांनी प्रभाग 9 मधून सदस्य पदाकरीता उमेदवारी अर्ज दाखल केला. तर गुरुवारी सौ. नंदा प्रल्हादराव भाले यांनी प्रभाग क्रमांक 11 क मधून, शेख शरीम फातेमा अब्दुल मलिक यांनी प्रभाग क्रमांक 8 ब मधून उमेदवारी अर्ज दाखल केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande